थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 20:10
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
खान्देश विशेष बातमी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा होणार ; , हार, शाल, बुके न आणता शेतकरी राजाला मदत करा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा होणार ;  ,   हार, शाल, बुके न आणता शेतकरी राजाला मदत करा

अमळनेर प्रतिनिधी :- जळगाव जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालिका तथा माजी जिल्हा परिषद सदस्या व माजी नगराध्यक्षा सौ जयश्रीताई अनिल पाटील यांचा वाढदिवस यंदा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीच्या वतीने हे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.

आज दि. २५ नोव्हेंबर रोजी जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस आहे. दरवर्षी हा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा तालुक्यात पावसाअभावी शेतकरी बांधव अडचणीत आहेत. पिके करपली असून, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती अमळनेर शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे की, वाढदिवसानिमित्त कोणीही हार, शाल अथवा बुके आणू नयेत.

त्याऐवजी शेतकरी बांधवांना दिलासा देणारे सामाजिक व मदतीचे उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा. गरजू शेतकऱ्यांना मदत, अन्नदान, पाणी वाटप, आरोग्य शिबिर असे समाजोपयोगी उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने वाढदिवसाची सार्थकता साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जयश्रीताई पाटील यांनी नेहमीच सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनीही सामाजिक बांधिलकी जपावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील आणि शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी केले आहे.

जाहिरात

शेअर करा

खान्देश : आणखी बातम्या

सर्व पहा
खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 3 तासांपूर्वी 11 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 7 तासांपूर्वी 12 खान्देश संविधान दिनी नोबेल पोद्दार स्कूलमध्ये संविधानाचा जागर! , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; विद… काल 45 खान्देश ज्ञानदीपाची ३२ वर्षे ५ महिन्यांची अखंड ज्ञानसेवा! आदर्श शिक्षक, संस्कारांचे शिल्पकार आणि स्काऊट… 2 दिवसांपूर्वी 1.1K खान्देश साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा 2 दिवसांपूर्वी 24 खान्देश सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अँड. जयसिंग वेडू कोळी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन , शिक्षण क्षेत्… 3 दिवसांपूर्वी 29

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 3 तासांपूर्वी 11 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 6 तासांपूर्वी 122 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 7 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 8 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 8 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 10 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 11 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 13 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 20