थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 20:18
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र विशेष बातमी

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह श्री तुळशी विवाह सोहळ्यानिमित्त आयोजन; हजारो भाविकांची ‌‘याची देही याची डोळा‌’ साक्ष

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह    श्री तुळशी विवाह सोहळ्यानिमित्त आयोजन; हजारो भाविकांची ‌‘याची देही याची डोळा‌’ साक्ष
थोडक्यातश्री मंगळग्रह मंदिरात श्री विष्णू-लक्ष्मीचा प्रतीकात्मक विवाह सोहळा उत्साहात अमळनेर : श्री तुळशी विवाह सोहळ्यानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात मंगळवारी (दि. २४) भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी मातेचा १५ वा प्रतीकात्मक विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत वैदिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी मंगलरथातून देवांची मिरवणूक, मंगलाष्टके, महाआरती व प्रसाद वाटप करण्यात आले. विवाह सोहळ्यापूर्वी माता-भगिनींसाठी हळद-मेंदी कार्यक्रमही उत्साहात पार पडला. खर्चिक बाबींना फाटा देत साधेपणाने धार्मिक परंपरा व संस्कृतीचे जतन करण्याचा आदर्श या उपक्रमातून मंगळग्रह सेवा संस्थेने घालून दिला.

अमळनेर प्रतिनिधी: हिंदू संस्कृतीत श्री तुळशी विवाहाला परंपरागत अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री तुळशी मातेच्या विवाहानंतर वधू-वरांच्या ब्रम्हगाठी विवाह सोहळ्यांच्या रूपाने बांधल्या जातात. ही परंपरा कायमस्वरूपी टिकून राहावी, श्री मंगळग्रह मंदिरात येणाऱ्या विवाहेच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी परमेश्वराची विशेष आराधना करावी, या उद्देशातून मंगळग्रह सेवा संस्थेने अतिशय शुभ व परम पवित्र अशा त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त श्री तुळशी विवाह सोहळ्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू केली आहे. यंदाचे हे 15 वे वर्ष आहे.

मंगळवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 15 मिनिटे या शुभ मुहूर्तावर अतिशय भक्तिमय व मंगलमय वातावरणात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा हजारो वऱ्हाडींच्या रूपाने उपस्थित भाविकांच्या ‌‘याची देही याची डोळा‌’ साक्षीने वैदिक पद्धतीने पार पडला. सर्व प्रकारच्या खर्चिक बाबींना फाटा देऊन सनातन व साध्या पद्धतीने संस्कृतीबद्ध हा कार्यक्रम झाला. वर राजा भगवान श्री विष्णूजी यांचे मामा म्हणून पिळोदे (ता. अमळनेर, ह. मु. पुणे) येथील भटू प्रकाश शिंदे, तर वर राणी श्री लक्ष्मी माता यांचे मामा म्हणून अमळनेर येथील सुनील माणिक बिऱ्हाडे (ह. मु. जळगाव) यांनी भूमिका निभावली. या विवाह सोहळ्यानिमित्त सकाळी श्री मंगळग्रह देवांच्या महाआरतीनंतर दिवसभर मंदिर परिसरात भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.

तत्पूर्वी, वर राजा भगवान श्री विष्णूजी व वर राणी श्री लक्ष्मी माता यांची संबळ वाद्याच्या साथीने मंगलरथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अनेक भाविकांनी जल्लोषपूर्ण नृत्याचा आनंद घेतला. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव व प्रसाद भंडारी यांनी मुख्य पौरोहित्य करीत विधिवत मंगलाष्टके म्हटली. त्यांना पुरोहित जयेंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, अतुल जोशी, विनोद पाठक चंद्रकांत जोशी, उमेश पाठक, चेतन नाईक, प्रवीण भंडारी यांनी सहकार्य केले.

हा सोहळा यशस्वितेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुळकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, मंगल सेवेकरी सौ. आशाताई महाले, प्रकाश मेखा, विनोद कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण यांच्यासह मंदिराच्या सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.

(चौकट...)

असंख्य माता-भगिनींच्या उपस्थितीत हळद, मेंदी कार्यक्रम

दरम्यान, श्री तुलसी विवाह सोहळ्यानिमित्त सोमवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 7.30 या वेळेत वर राजा भगवान श्री विष्णूजी व वधू राणी श्री लक्ष्मी माता यांच्या प्रतिकात्मक विवाहाच्या पूर्वसंध्येला संगीताच्या साथीने असंख्य माता-भगिनींच्या उपस्थितीत हळद, मेंदी कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाला. यावेळी माता-भगिनींनी नृत्य व फुगडी यांचा मनमुराद आनंद घेतला.

(चौकट...)

चाली, रूढी व परंपरांचे परिपूर्ण जतन

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे अत्यंत समाजाभिमुख व काळाची गरज असलेल्या एका उपक्रमास अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रारंभ केलेला आहे. त्या उपक्रमांतर्गत सर्वांना विवाह सोहळा पूर्णत: विधिवतरित्या आणि पैशांची उधळपट्टी न करता साधेपणाने करण्याची शपथ घेण्यासाठी सांगितले जाते. त्या शपथेच्या अनुषंगानेच मागील काही वर्षांपासून श्री तुळशी विवाह सोहळा अतिशय साधेपणाने मात्र पारंपरिक चाली, रूढी व परंपरांचे जतन करत हिंदी संस्कृतीप्रमाणेच केला जात आहे. त्यात भव्य सजावट आणि स्नेहभोजन यासाठी संस्थेतर्फे कोणताही खर्च केला जात नाही. देवांचा विवाह अत्यंत साधेपणाने मात्र पूर्णतः शास्त्रोक्त पद्धतीने केला जात आहे.

------

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 6 तासांपूर्वी 123 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 8 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 8 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 10 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 11 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 13 तासांपूर्वी 90

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 3 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 6 तासांपूर्वी 123 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 7 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 8 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 8 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 10 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 11 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 13 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 20