थेट बातम्यांकडे जा
रविवार, 29 नोव्हें 2026 20:09
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
2:34 PMसमतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल येथे २६ पुस्तकां… 11:29 AM२०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्देशीय संस्था व ज… 4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी…
महाराष्ट्र विशेष बातमी

महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी साकारल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका; फुले यांच्या शैक्षणिक कार्याला अभिवादन

महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात!    , दहावीच्या विद्यार्थ्यांनी साकारल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका; फुले यांच्या शैक्षणिक कार्याला अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी :

देवगाव (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये २८ नोव्हेंबर रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदरभाव निर्माण व्हावा, शिक्षकांच्या जबाबदारीची जाणीव व्हावी आणि महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने शाळेत हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा, याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रभर जनजागृती केली जात आहे. देवगाव देवळी एज्युकेशन सोसायटी, धुळे संचलित महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंचवीस वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या भूमिका

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एक दिवसासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका अत्यंत आत्मविश्वासाने व प्रभावीपणे साकारल्या. मुख्याध्यापिका म्हणून तनुश्री रवींद्र सोनवणे हिने जबाबदारी सांभाळली.

शिक्षकांच्या भूमिका प्रीती एकनाथ पाटील (मराठी), कृष्णा अशोक पाटील (हिंदी), अर्पिता प्रवीण बोरसे (इंग्रजी), अश्विनी अशोक माळी (इंग्रजी), खुशी योगेश पाटील (गणित भाग १), रितेश ज्ञानेश्वर पाटील (गणित भाग २), श्रेया सुरेश पाटील (विज्ञान भाग १), हर्षाली कांतीलाल पाटील (विज्ञान भाग २), भुवनेश विलास पाटील (इतिहास), प्रणव भाईदास माळी (भूगोल) आणि गणेश रवींद्र माळी (भूगोल) यांनी समर्थपणे पार पाडल्या.

तसेच मानव सुकलाल पाटील याने लिपिक, तर कृष्णा विनायक पाटील याने शिपाई यांची भूमिका साकारून शाळेच्या दैनंदिन कामकाजाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या भूमिका उपस्थितांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या.

महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर विद्यार्थ्यांचे विचार

कार्यक्रमात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता आठवीतील हर्षाली पाटील, पूर्वा पाटील, यशस्वी पाटील, दिव्या चौधरी तसेच इयत्ता नववीतील वेदिका पाटील यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले.

दहावीतील विद्यार्थी शिक्षक म्हणून प्रीती पाटील, श्रेया पाटील, अश्विनी महाजन, खुशी पाटील आणि कृष्णा पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या उपक्रमातून शिक्षकांची भूमिका, विद्यार्थ्यांप्रती असलेली जबाबदारी आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

महिला शिक्षणासाठी महात्मा फुले यांचे योगदान प्रेरणादायी : तनुश्री सोनवणे

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थी मुख्याध्यापिका तनुश्री सोनवणे हिने सर्व विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका अतिशय छान पद्धतीने साकारल्याचे सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले यांचे शैक्षणिक कार्य विशेषतः महिला शिक्षणासाठी केलेले योगदान संपूर्ण महिला वर्गासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे पुरोगामी विचार आणि सामाजिक परिवर्तनाची भूमिका देशाला महासत्ता बनविण्याच्या दिशेने निश्चितच मार्गदर्शक ठरतील, असे मत तिने व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी अर्पिता पाटील हिने प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन खुशी पाटील हिने केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिक्षक आय. आर. महाजन यांनी केले.

विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय. आर. महाजन, एस. के. महाजन आणि एच. ओ. माळी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील व गुरुदास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कार्याची जाणीव झाली, तसेच महात्मा फुले यांच्या शैक्षणिक विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा मिळाली. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, सामाजिक जाणीव आणि शिक्षकांविषयी आदरभाव विकसित होण्यास निश्चितच मदत होत आहे.

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र समतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल ये… 5 तासांपूर्वी 1.1K महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे काल 202 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! काल 93 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! काल 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ काल 43 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… काल 50

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

महाराष्ट्र समतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल ये… 5 तासांपूर्वी 1.1K खान्देश २०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्दे… 8 तासांपूर्वी 69 खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… काल 90 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे काल 202 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… काल 43 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! काल 93 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! काल 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ काल 43 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… काल 50 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… 2 दिवसांपूर्वी 39 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा 2 दिवसांपूर्वी 12 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील 2 दिवसांपूर्वी 29