जळगाव प्रतिनिधी
जिद्द, मेहनत आणि ध्येयाप्रती असलेल्या चिकाटीच्या जोरावर जळगावच्या दोन होतकरू विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात यशाचे पहिले पाऊल टाकले आहे. कुमारी सृष्टी किशोर पाटील आणि चिराग नितीन महाजन या दोघांची जॉर्जिया देशातील अवेसेना (Avicenna) युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. प्रवेश निश्चित झाल्यानंतर दोन्ही विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी जॉर्जियाला रवाना झाले असून, त्यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सृष्टी पाटील ही अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, डोमगाव, ता. जि. जळगाव येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले किशोर पाटील आणि मीनाक्षी ज्ञानदेव झांबरे (उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लमांजन) यांची कन्या आहे. तर चिराग महाजन हा जळगाव येथील महाजन झेरॉक्सचे संचालक नितीन महाजन आणि विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. नयना नितीन महाजन यांचा सुपुत्र आहे.
डॉ. ललित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 'गो ग्लोबल' संस्थेमार्फत दोन्ही विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. विशेष म्हणजे, दोन्ही विद्यार्थी कालच जॉर्जिया येथे सुखरूप पोहोचले असून त्यांच्या वैद्यकीय शिक्षणाच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.
या यशाबद्दल पाटील आणि महाजन परिवाराचे नातेवाईक, मित्रपरिवार, आप्तेष्ट, स्नेहीजन तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी विनोद पाटील सर, योगिता झांबरे मॅडम, अमरसिंग बोरसे (राणाजी), प्रवीण ठाकरे, हितेंद्र काळुंखे, प्रवीण भोळे, बाजीराव सोनवणे आणि कुमावत सर आदी मान्यवर मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित होते.
जळगावच्या या दोन गुणवंत विद्यार्थ्यांनी परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी घेतलेली भरारी निश्चितच अभिमानास्पद आहे. त्यांच्या हातून भविष्यात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा घडो आणि त्यांनी आपल्या कुटुंबासह जळगाव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रतिक्रिया (0)