अमळनेर प्रतिनिधी
दिनांक 24/11/2026 वार मंगळवार रोजी भावसार समाजाचे संत श्री खुशालदास महाराज फैजपूर निवासी यांचा पालखी सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात भावसार मढी येथे हिंगलाज माता व इतर देवतांना माल्यार्पण करून आरती करण्यात आली व त्यानंतर भंडारा उत्सव अन्नदानासाठी देणगी देणारे समाज बांधव श्री नारायण रघुनाथ शेठ भावसार त्यांच्या मातोश्री, अॅड. श्री. सी. जी. भारोटे व श्री राजेंद्र लिलाचंदशेठ सारजे, पुणे यांचा देखील छोटे खानी सत्कार करण्यात आला नंतर पालखीचे पूजन करून पालखी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनी व बाल गोपाल मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यानंतर वाजत गाजत व जयघोष करत पालखी मिरवणूक सराफ बाजार दगडी दरवाजा व शिवाजी मार्केट येथील संत खुशालदास महाराज यांच्या स्मारकावरील प्रतिमेस अध्यक्ष व उत्सव समिती चेअरमन यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.भावसार चौक येथे आतिषबाजी करण्यात आली नंतर कारंजा चौक मार्गे भक्त निवास, वाडी संस्थान, वाडी चौक येथे पालखी मिरवणुकीचा समारोप करण्यात आला व त्याच ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व समाजातील बंधू भगिनी व बालगोपाल मंडळी यांनी प्रसादाचा लाभ घेतला.
सदर कार्यक्रमास अंमळनेर भावसार समाजातील बंधू भगिनी व बालगोपाल मंडळी तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याच्या खासदार मा ताईसाहेब श्रीमती स्मिता उदय वाघ व इतर मान्यवर यांनी पालखी मिरवणुकीत सदिच्छा भेट दिली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमळनेर भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष व कार्यकारी मंडळ तसेच महिला मंडळ व इतर समाज बांधव यांचे अनमोल सहकार्य लाभले.
प्रतिक्रिया (0)