![]()
अमळनेर प्रतिनिधी
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. शाळेच्या शिक्षिका श्रीमती शारदा उंबरकर यांनी उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी विद्यार्थी मयूर गजानन पाटील याने संविधान दिनाचे महत्त्व आपल्या मनोगतातून विशद केले. तसेच डी. वाय. पाटील सर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, त्यातील मूलभूत मूल्ये आणि नागरिकांची कर्तव्ये यांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री. संदीप घोरपडे सर होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना त्यांनी संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला साने गुरुजी कन्या हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर धनगर सर, संस्थाचालक श्री. हेमकांत पाटील, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. समाधान पाटील सर यांनी केले. संविधानाचा आदर, लोकशाही मूल्यांची जपणूक आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रतिक्रिया (0)