Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! ,‘प्रकाशाचे परावर्तन व दैनंदिन जीवनातील उपयोग’ या वैज्ञानिक उपकरणाची बाजी; शिक्षक गटातही तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाची दुहेरी यशस्वी कामगिरीविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साने गुरुजी विद्यामंदिरचा प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! ,‘प्रकाशाचे परावर्तन व दैनंदिन जीवनातील उपयोग’ या वैज्ञानिक उपकरणाची बाजी; शिक्षक गटातही तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाची दुहेरी यशस्वी कामगिरी
खान्देश ब्रेकिंग न्यूज

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; शेतात पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद, पातरखेडे येथे केली पिकांची पाहणी अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

ईश्वर रामदास महाजन 04 Oct 2026, 12:49 9.8K views अपडेटेड 26 Oct 2026, 10:56 4 min read
🔧 साधने:
महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद;    शेतात पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद, पातरखेडे येथे केली पिकांची पाहणी    अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

जळगाव प्रतिनिधी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथील शेतकरी मधुकर पाटील यांच्या शेतात भेट देऊन कपाशी आणि मका पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांची सद्यस्थिती तसेच पिण्याचे पाणी, पीक पेरा आणि इतर अडचणींची माहिती जाणून घेतली. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.

या पहाणी दौ-यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड

.(एरंडोल), संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेताची पाहणी करतांना मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर बसून पिठलं, भाकरीचा आस्वाद घेतला. यावेळी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष गावात उपस्थित राहून काम करीत आहेत. तलाठ्यापासून ते जिल्हाधिकारी पर्यंत तसेच कृषी सहायकापासून ते विभागातील अधिकारी आणि कर्मचारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दुष्काळी परिस्थिती असेपर्यंत प्रशासनाने सतर्क व तत्पर राहून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

*कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना फोन न करण्याच्या सूचना*

बँकांकडून अपेक्षेच्या तुलनेत नवीन कर्जवाटप कमी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कर्जवाटपाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहकारी, राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी फोन करू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

*अवैध सावकारी विरोधात कारवाईचे निर्देश*

एरंडोल, यावल आणि रावेर तालुक्यांत अवैध सावकारी संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन अवैध सावकारी विरोधात नियमानुसार कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्यात.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने अतीतत्पर राहून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडून त्यांना मदत करावी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पुढील बातमी →जेन्झीने गांधींकडून निडरपणा घ्यावा , ज्येष्ठ कलावंत शंभू पाटील यांचे प्रतिपादन; नोबेल फाउंडेशन–सतपंथ प्रकल्पाच्या ‘जेन्झी आणि गांधी’ व्याख्यानात मार्गदर्शन

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!