थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 19:08
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र विशेष बातमी

महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार!

सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ व कमलनाम साहित्य मंचाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यतिथीनिमित्त कविसंमेलन; प्रा. वा. ना. आंधळे यांनी फुले यांच्या वैश्विक समाजभानाचा मांडला विचार.

महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार!
थोडक्यातएरंडोल येथे सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ व कमलनाम साहित्य मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी खान्देशातील प्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे होते. महात्मा फुले यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी, दलित व उपेक्षित समाजाच्या न्यायहक्कांसाठी तसेच स्त्रीशिक्षणाच्या प्रसारासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार बापूसाहेब महेंद्रसिंह पाटील यांनी फुले यांच्या विचारांचे केवळ गुणगान न करता त्यांचे आचरण करण्याचे आवाहन केले. विविध कवींनी कविता, पोवाडे, चारोळ्या व गीतकाव्य सादर करून रसिकांची दाद मिळवली. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमातून महात्मा फुले यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि परिवर्तनाच्या विचारांना काव्यरूपाने अभिवादन करण्यात आले.

एरंडोल प्रतिनिधी : तत्कालीन समाजाची मनावस्था व त्यातून पराकोटीला गेलेली सामाजिक विषमता यामुळे उपेक्षित व दलित समाजाच्या वाट्याला आलेल्या क्लेशदायी वेदना महात्मा जोतीराव फुले यांना सतावू लागल्या व त्यातूनच एका युगाने एका युगपुरुषाला जन्म दिला.त्या महात्मा फुले यांच्या समाजभानाला मानवंदना ही कृतीतून विचारातून दिली गेली तर पुण्यतिथी समारंभाची ती खऱ्या अर्थाने फलश्रुती ठरेल असे मतप्रतिपादन खान्देशातील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी उपस्थित जनसमुदायासमोर केले.आज दि.२८ नोव्हेम्बर२०२६ रोजी सूर्योदय जेष्ठ नागरिक संघ एरंडोल येथे सकाळी १० वाजता सूर्योदय जेष्ठ नागरिक संघ व कमलनाम साहित्य मंच एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कविसंमेलनात अध्यक्ष म्हणून प्रा. आंधळे बोलत होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात ते पुढे म्हणाले की,सामाजिक शुद्धीकरणासाठी फुले यांनी आपल्या लेखनातून आणि भाषणातून हयातभर केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनीच उपेक्षित दलित समाजाला न्यायाच्या दिशा खुल्या झाल्यात.अखंड,अभंग,पोवाडा,शेतकऱ्याचा आसूड,गुलामगिरी तृतीय रत्न या सारख्या साहित्य कृतीतून त्यांनी यथोचित प्रबोधन करीत स्त्री शिक्षणासाठी केलेले अथक प्रयत्न एका नव्या युगाची रुजवात करणारे ठरले.असे सांगत ज्ञानज्योति सावित्री या शिर्षकाची कविता सादर करीत अध्यक्षीय भाषण केले. या पुण्यतिथी संमेलनात व्यासपीठावर तालुक्याचे माजी आमदार बापूसाहेब महेंद्रसिंह पाटील,सूर्योदय जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रावसाहेब अरुणकुमार माळी, माजी अध्यक्ष जाधवराव जगताप,या प्रमुख अतिथींसह विजय जाधव,नारायण मोरे,रवींद्र लाळगे सर सर,विनायक कुलकर्णी यांची उपस्थिती होती. महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते पुष्पमाल्यार्पण संपन्न होत प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलनाम मंचचे सचिव विनायक कुलकर्णी यांनी केले. कवी संमेलनात सर्वश्री पी.जी.चौधरी सर,निंबा पुना बडगुजर,सौ.सरिता रघुवंशी,डॉ.तुषार वडगावकर,श्रीमती प्रमिलाबाई धनसिंग पाटील,विनायक कुलकर्णी,सखाराम शंकर ठाकूर, प्रवीण महाजन,नामदेव पाटील ,निंबा कुंभार यांनी आपल्या दमदार रचना चारोळी,गितकाव्य, पोवाडा,मुक्तछंद ओवी या विविध काव्य प्रकारातून गायन आणि वाचन सादर करीत श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळवली. याच समारंभात प्रमुख अतिथी बापूसाहेब महेंद्रसिंह पाटील यांनी आपल्या मनोगतातून सत्यशोधक समाजाची स्थापना आणि त्यातून विचारांचा स्वतः मी केलेला अनुनय व त्यातून चाळीस वर्षांपूर्वी स्वसमाजातील एका विधवेच्या व तरुणाच्या विवाहासाठी केलेले प्रयत्न व त्यातून आलेल्या संकटांना दिलेला शह कथन करीत तरुणांनी समाज सुधारकांचा नुसता जयजयकार करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे अनुसरण करावे असे आवाहन त्यांनी केले.तर प्रमुख अतिथी रावसाहेब अरुणकुमार माळी यांनी सूर्योदय व कमलनाम या दोन्ही मंचाच्या आयोजन नियोजन याबाबत प्रेरणा देत महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला मानवंदना दिली. आभार प्रदर्शन कवी पी.जी.चौधरी सर यांनी केले तर सूत्र संचलन विनायक कुलकर्णी,प्रवीण महाजन व निंबा पुना बडगुजर यांनी केले.कार्यक्रमास जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच कमलनाम साहित्य मंचचे संचालक मंडळ व रसिक श्रोते यांच्या उपस्थिती सोबत दै.नवराष्ट्र या वृत्तपत्राचे पत्रकार मा.शरद महाजन सर यांची खास उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश राजधर देशमुख व दिलीप वामनराव तावडे यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 27 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 10 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 2 तासांपूर्वी 10 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 6 तासांपूर्वी 11 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 27 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 10 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 18 खान्देश संविधान दिनी नोबेल पोद्दार स्कूलमध्ये संविधानाचा जागर! , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; विद… काल 45