थेट बातम्यांकडे जा
रविवार, 29 नोव्हें 2026 20:21
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
2:34 PMसमतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल येथे २६ पुस्तकां… 11:29 AM२०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्देशीय संस्था व ज… 4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी…
खान्देश विशेष बातमी

२०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्देशीय संस्था व जस्ट राईट फॉर चिल्ड्रनचा पुढाकार; जिल्ह्यातील २०० हून अधिक ठिकाणी शपथविधी, २,५०० हून अधिक विद्यार्थी, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

२०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर   , आधार बहुउद्देशीय संस्था व जस्ट राईट फॉर चिल्ड्रनचा पुढाकार; जिल्ह्यातील २०० हून अधिक ठिकाणी शपथविधी, २,५०० हून अधिक विद्यार्थी, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर प्रतिनिधी

2030 पर्यंत भारत बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प घेऊन 27 नोव्हेंबर बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिना निमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न.

जिल्हा महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन व आधार बहुउद्देशीय संस्था,अमळनेर यांच्या जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या प्रकल्पांतर्गत 200 अधिक ठिकाणी शाळा,महाविद्यालय, ग्रामपंचायती येथे बालविवाह मुक्तीची शपथ घेण्यात आली. ज्यात 2500 हून अधिक विद्यार्थी,महिला व पुरुष नागरिकांनी घेतला सहभाग.

मुख्य कार्यक्रम जळगाव येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सौ. पद्मावती नथमलजी लुंकड कन्याशाळा, जळगाव येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर ही जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन (JRC) या राष्ट्रीय स्तरावरील नेटवर्कची भागीदार संस्था असून, गेल्या तीन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध व बालहक्क संरक्षणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपक्रमांना सहकार्य करीत आहे.

या कार्यक्रमात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव श्री. ऋषिकेश काळे यांनी शाळेतील सुमारे ३०० विद्यार्थिनींना बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालविवाहाचे दुष्परिणाम आणि बालविवाह रोखण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर तरतुदी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेची माहिती देताना एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ कोणत्या परिस्थितीत मिळू शकतो, त्यासाठी अर्ज कसा करावा आणि शैक्षणिक व आरोग्यविषयक गरजांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा उपयोग कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. आई-वडील दोघेही नसलेल्या अनाथ बालकांसाठी अनाथ प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया देखील समजावून सांगितली.

बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास किंवा कोणत्याही प्रकारची समस्या अथवा अडचण निर्माण झाल्यास तात्काळ चाइल्ड हेल्पलाइन १०९८ वर संपर्क साधावा. तसेच शिक्षक, शिक्षिका, ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका किंवा आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे आणि भविष्यात चांगल्या उद्योजिका होण्याचे ध्येय ठेवावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शनही त्यांनी केले.

यानंतर आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत बालविवाह का करू नये, बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर, व्यक्तिमत्त्व विकासावर आणि भविष्यावर होणारे विपरीत परिणाम याविषयी सोप्या भाषेत कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच मीनाक्षी कोळी यांनीही बालविवाह प्रतिबंध व जनजागृतीसंदर्भात मार्गदर्शन केले.

नंतर शाळेच्या प्राचार्य लीना कुळकर्णी मॅडम यांनी मुलींना शासकीय योनेचा लाभ घेण्या संदर्भात सांगितले,तसेच सर्व शिक्षकवृंद यांना सांगितले आपल्या शाळेत असलेले एकल पालक व दोन्ही पालक नसलेल्या मुलींची यादी करून त्यांना लाभ कसा दिला जाऊ शकेल यासाठी पर्यंत करणे.

या कार्यक्रमाला चाईल्ड चे कुणाल शुक्ला, एल. आर. सपकाळे , शाळेतील शिक्षक व शिक्षिका वृंद, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील, संचालक रेणुप्रसाद, दीपक संदानशिव, प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, क्षेत्र समन्वयक मोहिनी धनगर, सुनील हिवाळे, दिपाली हिवाळे, समाधान पाटील आदी उपस्थित होते.

बालविवाहमुक्त भारत घडविण्यासाठी शासन, शाळा, सामाजिक संस्था, पालक आणि समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुलांचे बालपण सुरक्षित ठेवणे, मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे हीच बालविवाहमुक्त समाजाच्या निर्मितीची खरी दिशा आहे, असा सामाजिक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

शेअर करा

खान्देश : आणखी बातम्या

सर्व पहा
खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… काल 90 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… काल 43 खान्देश संविधान दिनी नोबेल पोद्दार स्कूलमध्ये संविधानाचा जागर! , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; विद… 2 दिवसांपूर्वी 48 खान्देश ज्ञानदीपाची ३२ वर्षे ५ महिन्यांची अखंड ज्ञानसेवा! आदर्श शिक्षक, संस्कारांचे शिल्पकार आणि स्काऊट… 3 दिवसांपूर्वी 1.1K खान्देश साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा 3 दिवसांपूर्वी 25 खान्देश सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अँड. जयसिंग वेडू कोळी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन , शिक्षण क्षेत्… 4 दिवसांपूर्वी 31

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

महाराष्ट्र समतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल ये… 5 तासांपूर्वी 1.1K खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… काल 90 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे काल 202 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… काल 43 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! काल 93 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! काल 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ काल 43 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… काल 50 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… काल 111 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… 2 दिवसांपूर्वी 39 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा 2 दिवसांपूर्वी 13 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील 2 दिवसांपूर्वी 30