थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 19:22
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
खान्देश विशेष बातमी

योगासन स्पर्धेत नाशिक विभागातील खेळाडूंची चमकदार कामगिरी! चार प्रकारांत रंगलेल्या स्पर्धेत गुणवंत खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; सांगली येथे रंगणार राज्यस्तरीय सामने नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते विभागीय स्पर्धेचे उद्घाटन;

योगासन स्पर्धेत नाशिक विभागातील खेळाडूंची चमकदार कामगिरी!    चार प्रकारांत रंगलेल्या स्पर्धेत गुणवंत खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; सांगली येथे रंगणार राज्यस्तरीय सामने  नामदार संजय सावकारे यांच्या हस्ते विभागीय स्पर्धेचे उद्घाटन;

भुसावळ प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि ताप्ती स्कूल, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक विभागीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेत विभागातील खेळाडूंनी विविध प्रकारांत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. चार प्रकारांतील चुरशीच्या स्पर्धेनंतर गुणवंत खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन ताप्ती स्कूलच्या प्राचार्या नीना कटलर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, योगासन राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना नामदार संजय सावकारे यांनी योगामुळे शारीरिक आरोग्य, मानसिक सामर्थ्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या विभागीय स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्यांसह महानगर क्षेत्रांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धा ट्रेडिशनल सोलो, आर्टिस्टिक सोलो, रिदमिक पेअर आणि आर्टिस्टिक पेअर या चार प्रकारांत घेण्यात आली.

स्पर्धेचा गटनिहाय निकाल

१. ट्रेडिशनल सोलो

१४ वर्षांखालील मुली १. सानवी सुयश बुरुकुल २. केतकी हेमंग शिनकर ३. तेजस्विनी सुयश बागुल

१४ वर्षांखालील मुले १. ध्रुपद चेतन बोरसे २. आदित्य संजय उमरानकर ३. प्रतीक महेंद्र राऊत

१७ वर्षांखालील मुली १. तेजस्विनी सोमनाथ वाघ २. प्रिया भरत पवार ३. श्रमिका केरबा अथलवाड

१७ वर्षांखालील मुले १. अभिनव कैलास जोहरे २. पार्थ अर्जुन खताळ ३. मानराज योगराज चौधरी

१९ वर्षांखालील मुली १. यशश्री प्रदीप नांद्रे २. नेहा सतीश पवार ३. नंदिनी बळीराम आंबेकर

१९ वर्षांखालील मुले १. निखिल संतोष भोई २. प्रियांशु संतोष जाधव ३. आर्यन साहेबराव कोळी

२. आर्टिस्टिक सोलो

१४ वर्षांखालील मुली १. सानवी सुयश बुरुकुल २. चारू हर्षल काळे ३. आरुषी योगेश देसले

१४ वर्षांखालील मुले १. चैतन्य विजय पवार २. सत्यजित अमरजीत हंगरगेकर ३. वेदांत योगेश भोई

१७ वर्षांखालील मुली १. तेजस्विनी सोमनाथ वाघ २. श्रमिका अथलवाड ३. स्वरा कुलकर्णी

१७ वर्षांखालील मुले १. मानराज योगराज चौधरी २. साहिल भाऊसाहेब म्हस्के ३. अभिनव कैलास जोहरे

१९ वर्षांखालील मुली १. देवश्री सुभाष पाटील २. खुशी जसवानी ३. नेहा सतीश पवार

१९ वर्षांखालील मुले १. सर्वज्ञ प्रेमनंद गोसावी २. धारव लक्ष्मीकांत नेमाडे ३. नीरज सुरेश कुंभार

३. रिदमिक पेअर

१४ वर्षांखालील मुली १. आरोही झाल्टे व दिव्या सांखल २. स्वरा मोगल व श्रद्धा डेरले ३. मृण्मयी दीक्षित व पूर्वा मुदगल ४. भार्गवी सोनवणे व शर्वरी कोठावदे

१४ वर्षांखालील मुले १. समर्थ सोमासे व सस्मित जाधव २. अंश निसाळ व समर्थ पवार ३. राजवीर शेलार व वैष्णव जाधव

१७ वर्षांखालील मुली १. प्रिया पवार व पलक कदम २. ऐश्वर्या खडके व अदिती भंगाळे ३. वर्षा मासुळे व पवित्रा पाटील

१७ वर्षांखालील मुले १. अभिनव जोहरे व शेख जुनेद अझरुला २. सोहम राठोड व आशिष शेळके ३. राघवेंद्र लोहार व अर्णव खंडेलवाल

१९ वर्षांखालील मुली १. आशवी कोठारी व तानिया जनानी २. अन्वी कोटीचा व ध्रुवी बडाले ३. नम्रता कोकणी व नताशा बागुल

१९ वर्षांखालील मुले १. निखिल भोई व धारव नेमाडे २. जयवर्धन सुपाने व कनिष्क हिरे ३. चेस नं. ३७ – भोसला मिलिटरी स्कूल

४. आर्टिस्टिक पेअर

१४ वर्षांखालील मुली १. चारू काळे व जिया सावलानीकर २. दिव्या सांखळ व आरोही झाल्टे ३. मानसी कोकणी व तेजस्वी बागुल

१४ वर्षांखालील मुले १. चैतन्य पवार व अनय महाजन २. प्रयाग पाटील व रुद्रप्रसाद भंगाळे ३. समर्थ सोमासे व सस्मित जाधव

१७ वर्षांखालील मुली १. हर्षाली वीरकर व ईश्वरी सुराडकर २. श्रावणी जाधव व शुभ्रा वाणी ३. प्रिया पवार व पलक कदम

१७ वर्षांखालील मुले १. सोहम राठोड व आशिष शेळके २. निशांत खलाणे व अभिनव गोराणे

१९ वर्षांखालील मुली १. अन्वी कोटीचा व ध्रुवी बडाले २. याशवी कोठारी व तानिया जनानी ३. अमृता रायते व समृद्धी सानप

१९ वर्षांखालील मुले १. ओम संजय झोडगे व एम. लकी रेड्डी २. नीरज कुंभार व पुष्पराज गायकवाड ३. श्रीवेद पवार व सम्राट जाधव

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडू सज्ज

वरील सर्व प्रकारांतील गुणवंत खेळाडूंची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा ३१ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२६ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, सांगली येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी योगासन राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी, डॉ. प्रदीप साखरे, विजय संकेत, लक्ष्मीकांत नेमाडे, सुनील चौधरी, गणेश बोदडे, गणेश टिंटोरे यांच्यासह पंच, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या स्पर्धेमुळे नाशिक विभागातील योगासन खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही त्यांनी उज्ज्वल यश संपादन करावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास पाटील यांनी केले

शेअर करा

खान्देश : आणखी बातम्या

सर्व पहा
खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 2 तासांपूर्वी 11 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 6 तासांपूर्वी 12 खान्देश संविधान दिनी नोबेल पोद्दार स्कूलमध्ये संविधानाचा जागर! , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; विद… काल 45 खान्देश ज्ञानदीपाची ३२ वर्षे ५ महिन्यांची अखंड ज्ञानसेवा! आदर्श शिक्षक, संस्कारांचे शिल्पकार आणि स्काऊट… 2 दिवसांपूर्वी 1.1K खान्देश साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा 2 दिवसांपूर्वी 24 खान्देश सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अँड. जयसिंग वेडू कोळी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन , शिक्षण क्षेत्… 3 दिवसांपूर्वी 28

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 2 तासांपूर्वी 11 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 6 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 7 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 11 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 19