अमळनेर प्रतिनिधी
थोर आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात ‘जनजातीय गौरव दिवस’ साजरा करण्यात आला. यानिमित्त अमळनेर येथेही भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले.
यावेळी अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, नगरसेवक व शिवसेना गटनेते पंकज पंडित चौधरी, शिवसेना नगरसेवक प्रतोद नाविद शेख, युवासेना शिवसेना अमळनेरचे माजी तालुकाप्रमुख राहुल भास्कर कंजर यांच्यासह पन्नालाल मावळे, राज पारधी, यश पारधी, यश मालचे, बुरा पारधी आणि प्रकाश पारधी उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध दिलेला लढा, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष आणि स्वाभिमानासाठी केलेले कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.
प्रतिक्रिया (0)