थेट बातम्यांकडे जा
रविवार, 29 नोव्हें 2026 20:40
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
2:34 PMसमतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल येथे २६ पुस्तकां… 11:29 AM२०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्देशीय संस्था व ज… 4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी…
खान्देश विशेष बातमी

स्वतःच्या दिवाळीपेक्षा गरजवंतांच्या आनंदाला प्राधान्य; मंगळग्रह संस्थेचा स्तुत्य उपक्रम

स्वतःच्या दिवाळीपेक्षा गरजवंतांच्या आनंदाला प्राधान्य; मंगळग्रह संस्थेचा स्तुत्य उपक्रम


अमळनेर प्रतिनिधी : एकीकडे दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट, तर दुसरीकडे दिवाळीचा सण अशा स्थितीत गरजवंतांच्या घरातही आनंदाचा दीप उजळावा आणि त्यांच्या दिवाळीत गोडवा निर्माण व्हावा, या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत येथील मंगळग्रह सेवा संस्थेने अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ‌‘माणुसकीची दिवाळी‌’ हा स्तुत्य उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत संस्थेतर्फे तालुक्यातील ग्रामीण भागातील एक हजारांवर गरजवंतांना दिवाळी फराळ कीट वाटप केले.

तालुक्यातील अनोरे, शिरूड, तासखेडे, आमोदे, तासखेडा, गलवाडे, अमळगाव, खौशी, गंगापुरी, कन्हेरे, पातोंडा, लोण, मारवड, सात्री, कळमसरे, रत्नापिंप्री, दापोरी आणि कोळपिंप्री आदी गावांमध्ये संस्थेतर्फे विश्वस्त व सेवेकरी यांनी दिवाळई फराळाचे कीट वाटप केले. तसेच काही गावांतील गरजू कुटुंबांना नवीन ड्रेस, तर काही ठिकाणी वापरण्यायोग्य जुने कपडेही वितरीत केले. त्यामुळे आर्थिक परिस्थितीने बेजार झालेल्यांनाही दिवाळी सणाचा आनंद साजरा करण्यातील अडचणी दूर होऊन या कुटुंबांतील सदस्यांच्या चेहऱ्यावर सकारात्मक हास्य फुलले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सणासुदीच्या काळात आधार मिळावा, या उद्देशाने संस्थेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांची माहिती देत गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा हा प्रयत्न करण्यात आला. अशा उपक्रमांना व्यापक स्वरूप मिळावे आणि गरजूंची दिवाळीही आनंददायी व्हावी, यासाठी दानशूर व्यक्तींनी फराळ, कपडे व अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले होते.

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे हा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे तसेच मंगल सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, बाळा पवार आदींनी मंदिराच्या सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे दिवाळीचा खरा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंपर्यंत पोहोचविण्यासंदर्भातील ‌‘माणुसकीची दिवाळी‌’ या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचा संदेश गावा-गावांत पोहोचला.

----

शेअर करा

खान्देश : आणखी बातम्या

सर्व पहा
खान्देश २०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्दे… 9 तासांपूर्वी 72 खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… काल 90 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… काल 43 खान्देश संविधान दिनी नोबेल पोद्दार स्कूलमध्ये संविधानाचा जागर! , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; विद… 2 दिवसांपूर्वी 48 खान्देश ज्ञानदीपाची ३२ वर्षे ५ महिन्यांची अखंड ज्ञानसेवा! आदर्श शिक्षक, संस्कारांचे शिल्पकार आणि स्काऊट… 3 दिवसांपूर्वी 1.1K खान्देश साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा 3 दिवसांपूर्वी 25

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

महाराष्ट्र समतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल ये… 6 तासांपूर्वी 1.1K खान्देश २०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्दे… 9 तासांपूर्वी 72 खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… काल 90 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे काल 202 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… काल 43 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! काल 93 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! काल 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ काल 43 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… काल 50 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… काल 111 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… 2 दिवसांपूर्वी 39 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा 2 दिवसांपूर्वी 13