थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 19:08
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र विशेष बातमी

अमळनेर येथे रविवारी नांदी साहित्य संमेलनाचे आयोजन , अहिराणी बोलीभाषांचा जागर, मुलाखत, कविसंमेलन आणि शाहिरी कलाविष्काराची मेजवानी

अमळनेर येथे रविवारी नांदी साहित्य संमेलनाचे आयोजन  ,  अहिराणी बोलीभाषांचा जागर, मुलाखत, कविसंमेलन आणि शाहिरी कलाविष्काराची मेजवानी
थोडक्यातनांदी साहित्य संमेलनातून खान्देशच्या बोलीभाषा, साहित्य आणि लोककलेचा जागर अमळनेर : पुणे येथे जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या एकदिवसीय संमेलनात खान्देशातील अहिराणी, भिलाऊ, लेवा गण, गुजर आणि पावरा या बोलीभाषांच्या विविधतेवर परिसंवाद, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक राजू बाविस्कर यांची प्रकट मुलाखत, गझल व कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन आणि शाहिरी कलाविष्कार असे विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ज्येष्ठ कवी व गीतकार प्रकाश पाटील-पिंगळवाडेकर संमेलनाध्यक्ष, तर कवी तथा निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन स्वागताध्यक्ष असतील. सकाळी ८.३० वाजता जलपूजनाने संमेलनाचा प्रारंभ होणार असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानही करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता लोकशाहीर शिवाजीराव पाटील व सहकाऱ्यांचा 'रंग शाहिरी कलेचा' हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. खान्देशच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा, बोलीभाषांचा आणि साहित्यिक परंपरेचा गौरव करणाऱ्या या संमेलनात साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अमळनेर शाखेतर्फे करण्यात आले आहे.

अमळनेर (प्रतिनिधी) : मराठी साहित्याच्या शताब्दी साहित्य संमेलनाच्या ऐतिहासिक पर्वाची नांदी म्हणून अमळनेर येथे रविवारी २९ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे येथे २७ ते ३० जानेवारी २०२७ या कालावधीत होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या संमेलनातून खान्देशच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा, अहिराणी बोलीभाषांचा आणि साहित्यिक परंपरेचा जागर करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अमळनेर शाखा अध्यक्ष संदीप घोरपडे, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक व कोषाध्यक्ष उमेश काटे यांनी दिली आहे.

या एकदिवशीय नांदी संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, चित्रपटलेखक, गीतकार प्रकाश पाटील-पिंगळवाडेकर, तर स्वागताध्यक्षपदी कवी तथा निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन यांची निवड करण्यात आली आहे. स्व. साहित्यिक आबासाहेब अभिमन्यू नथू पाटील साहित्यनगरीत सकाळी ८.३० वाजता संमेलनाचा प्रारंभ होईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जल पूजनाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्व. कवी निंबा सदाशिव पाटील सभागृहात होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष तथा प्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर (पुणे) असतील. यावेळी समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक राजेश पांडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, म.सा.प. उपाध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप, विभागीय कार्यवाह डॉ. संजीव गिरासे, जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य डॉ. वासुदेव वले व गणेश आढाव आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध संस्था तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. मनोहर नेरकर, निरंजन पेंढारे सूत्रसंचालन करतील.

*खान्देशातील बोलीभाषांच्या विविधतेवर परिसंवाद*

संमेलनाच्या पहिल्या सत्रात सकाळी १०.३० ते दुपारी १२.४५ या वेळेत 'कान्हदेशातील वैभवशाली बोलीभाषांची विविधता' या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष मुंबईचे बापूसाहेब हटकर असतील. प्रा. डॉ. फुला बागुल (अहिराणी बोली), सुनील गायकवाड (भिलाऊ बोली), प्रा. संध्या महाजन (लेवा गण बोली), विलास पाटील (गुजर बोली) आणि प्रा. डॉ. मोहन पावरा (पावरा बोली) हे वक्ते विविध बोलीभाषांचे वैशिष्ट्य उलगडणार आहेत.अहिराणी भाषेतील नाट्यकर्मी प्रवीण माळी यांचे बहारदार सादरीकरण होईल.तर प्रा. बी. एन. चौधरी, प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कांबळे सूत्रसंचालन करतील.

दुपारी १ ते २ या दुसऱ्या सत्रात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक व प्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. भाऊसाहेब देशमुख, शरद पाटील हे मुलाखतकार म्हणून संवाद साधतील.

दुपारी २ ते ४ या तिसऱ्या सत्रात गझल संमेलन आणि कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान धुळे येथील कवी प्रा. प्रभाकर शेळके भूषवतील. या सत्रात प्रकाश पाटील (अमळनेर), सागर कोळी (पाडळसरे), विजय निकम (चाळीसगाव), भाऊसाहेब पाटील (जवखेडे), रमेश महाले (शहादा), गो. शि. म्हसकर (नगरदेवळा), ज्ञानेश्वर सूर्यवंशी (धुळे), प्रवीण पवार (शिरपूर), जयराम मोरे (सोनीनगर), तुषार पाटील (धरणगाव), योगिता पाटील (चोपडा), प्राची पाटील (पुणे), आशा सोनवणे (जळगाव), नयन पाटील (अमळनेर) यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमेश माने, सुनीता पाटील करतील.

*पुस्तक प्रकाशन आणि शाहिरी कलाविष्कार*

दुपारी ४ ते ४.३० या चौथ्या सत्रात पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होईल. विजया गायकवाड, प्रा डॉ ज्ञानेश्वर मराठे सूत्रसंचालन करतील. त्यानंतर समारोपाच्या सत्रात सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्र शाहीर परिषद शाखा जळगाव आणि खान्देश लोक रंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'रंग शाहिरी कलेचा' हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. खान्देशभूषण लोकशाहीर शिवाजीराव पाटील व सहकारी आपल्या शाहिरी सादरीकरणातून खान्देशी लोककलेचा आविष्कार घडवतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश काटे, भारती सोनवणे करणार आहेत.

यावेळी संमेलनाचे स्वागत समिती सचिव बन्सीलाल भागवत, सहसचिव संजय चौधरी, सदस्य डॉ. डिगंबर महाले, ॲड. प्रशांत निकम, ॲड. व्ही.आर. पाटील, बजरंगलाल अग्रवाल, प्रा. श्याम पवार, प्रा. डॉ. एस. ओ. माळी, हिरामण कंखरे, सुषमा देसले, वसुंधरा लांडगे, डॉ. मयुरी जोशी आदी उपस्थित राहतील.

*मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन*

खान्देशच्या विविध बोलीभाषा, साहित्य, कविता, गझल आणि लोककलेचा एकाच व्यासपीठावर संगम घडविणाऱ्या या नांदी साहित्य संमेलनात साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन म.सा.प. शाखा अध्यक्ष संदीप घोरपडे, प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कोषाध्यक्ष उमेश काटे, कार्याध्यक्ष रमेश पवार, उपाध्यक्ष भाऊसाहेब देशमुख, सहकार्यवाह विजया गायकवाड, कार्यकारिणी सदस्य नरेंद्र निकुंभ, गोकुळ बागूल, दिलीप सोनवणे, प्रा. डॉ. रमेश माने, प्रा.डॉ. ज्ञानेश्वर मराठे, निरंजन पेंढारे, शरद पाटील, सुनीता पाटील, भारती सोनवणे, प्रा. बी. एन. चौधरी, मनोहर नेरकर यांनी केले आहे.

संमेलनासाठी श्री मंगळग्रह सेवा संस्था, मराठी वाडमय मंडळ, अमळनेर, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालय, खान्देश साहित्य संघ, साहित्य भारती यांचे सहकार्य लाभणार आहे.

-----------------------------------

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 7 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 27 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 10 तासांपूर्वी 43 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 2 तासांपूर्वी 10 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 6 तासांपूर्वी 11 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 7 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 27 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 10 तासांपूर्वी 43 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 18