थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 19:08
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र विशेष बातमी

संविधानाचा सन्मान हाच लोकशाहीचा प्राण! पायमल्ली झाली तर देशात अराजकतेचा उद्रेक – जयसिंग वाघ यांचा परखड इशारा

संविधानाचा सन्मान हाच लोकशाहीचा प्राण! पायमल्ली झाली तर देशात अराजकतेचा उद्रेक – जयसिंग वाघ यांचा परखड इशारा

जळगाव प्रतिनिधी :- संविधान हे देशाला अखंड राखणारे , सर्व देशवासीयांना सुरक्षित ठेवणारे , देशात शांतता , सुरक्षा , एकता आबादित राखणारे महान दस्तावेज असते , संविधानाला राबविणाऱ्या लोकांनी तिची पायमल्ली केल्यास देशात अराजकता माजते हे नेपाळ , बांगला देश , श्रीलंका आदी देशांनी दाखऊन दिले आहे असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.

सूर्य जीवनी बहुउद्येशिय संस्था व झालटे प्रतिष्ठान तर्फे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.

आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात जयसिंग वाघ यांनी अमेरिका , फ्रान्स देशातील संविधान निर्मिती व भारतातील संविधान निर्मिती यातील मूलभूत फरक व त्या त्या देशातील संविधानामुळे त्या त्या देशात घडून आलेले सामाजिक , धार्मिक , राजकीय परिवर्तन विषद केले . अमेरिकेच्या राज्यघटनेत 82 वर्षांनी * समता * हे तत्त्व समाविष्ट करण्यात आले तर * मानवमुक्तीचा जाहीरनामा * फ्रान्स मध्ये 1 वर्षांनी जाहीर झाला मात्र आपल्या संविधानात ही तत्त्वं सुरवाती पासूनच समाविष्ट झालेली आहेत . भारतीय संविधानाने विविध देशातील संविधानातील तत्त्वं स्वीकारली आहेत असा अपप्रचार भारतात करण्यात येतो , अभ्यासक्रमात सुद्धा असे शिकविले जाते मात्र हा भारतीय संविधानाचे अवमूल्यन करणारा खोडसाळ प्रकार आहे असेही वाघ यांनी स्पष्ट केले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा उद्योजक संजय इंगळे होते त्यांनी भारतीय संविधानाचे महत्व व नागरिक म्हणून आपली जबाबदारी या विषयी विचार व्यक्त केले .

प्रा. हरिश्चंद्र सोनवणे यांनी प्रास्ताविकपर भाषणात संविधान दिनाचे महत्त्व सांगून संविधान लिहिताना बाबासाहेबांनी किती मेहनत घेतली याची माहिती दिली .

सूत्रसंचालन सुकदेव तायडे यांनी तर आभार प्रदर्शन मिलिंद सपकाळे यांनी केले .

सुरवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी मुकुंद सपकाळे , दीपक तांबोळी , दिलिप तासखेडकर , रवींद्र इंगळे , अशोक धुरंधर तसेच विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 121 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 7 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 27 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 10 तासांपूर्वी 43 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 2 तासांपूर्वी 10 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 121 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 6 तासांपूर्वी 11 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 7 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 27 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 10 तासांपूर्वी 43 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 18