आशा स्वयंसेविकांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर! , धुळे महानगरपालिका प्रशासनाकडे सानुग्रह अनुदान देण्याची मागणी; निवेदनाद्वारे पुन्हा लक्ष वेधले.
ईश्वर रामदास महाजन 528 वाचने 4 मिनिटांचे वाचन
धुळे प्रतिनिधी
धुळे महानगर पालिका अधिपत्याखालील कार्यरत सुमारे 188 आशा स्वयंसेविकांना दिवाळी बोनस ( सानुग्रह अनुदान) लागू करावा असे आशयाची मागणी करणारे निवेदन महापौर मा.श्रीमती मायादेवी परदेशी तसेच आयुक्त मा.श्री. नितीन कापडणीस यांना आशा स्वयंसेविका युनियनचे रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दि. 2 नोव्हेंबर 2026 रोजी देत सविस्तर चर्चा केली होती.
सदर चर्चेत आशा स्वयंसेविकांना अन्य महानगर पालिकांच्या धर्तीवर धुळे महानगरपालिकेतील आशा स्वयंसेविकांना दिवाळी बोनस ( सानुग्रह अनुदान) लागू करावा.अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली यावर दिवाळी बोनस देता येईल किंवा कसे याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शन मागवून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे महापौर यांनी शिष्टमंडळाला आश्वाशित केले.
तर दुसरीकडे आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेत दिवाळी बोनस(सानुग्रह अनुदान) आशाताईंना देण्यासाठी निधीची उपलब्धता आहे किंवा काय आणि प्रत्येकी किती देता येऊ शकेल याची सविस्तर माहिती संबंधित विभागाकडून घेऊन निर्णय घेतला जाईल असे श्री. कापडणीस यांनी सांगितले.
परंतु दिवाळी होऊन 10 ते 12 दिवस उलटून गेले तरीही महानगर पालिकेने सानुग्रह अनुदान देणेबाबत कोणताही निर्णय घेताना नसल्याने आशा सेविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
म्हणून आज पुनःच्छ महानगर पालिकेचे उपायुक्त श्री. हेमंत निकम यांना शिष्टमंडळाने निवेदन देत सानुग्रह अनुदान देण्याबाबत पुन्हा आग्रही मागणीची आठवण करून दिली.
प्रतिक्रिया (0)