अमळनेर
मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती! अमळनेरात जयनिल फाऊंडेशन आयोजित शाडू माती गणपती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती! अमळनेरात जयनिल फाऊंडेशन आयोजित शाडू माती गणपती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद अमळनेर:प्रतिनिधी-पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश रुजविण्यासाठी जयनिल फाऊंडेशन, अमळनेर तर्फे आज मराठा मंगल कार्यालय येथे भव्य तालुकास्तरीय शाडू माती गणपती कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती” या संदेशाने झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणरायाची मूर्ती […]
आपण, करूया भक्तीचा महोत्सव ! , कृष्ण जन्माष्टमी पर्वानिमित्त ‘कृष्णोत्सव’ भजन सेवाव्रती संमेलन २०२६ श्री नारायणी महिला मंडळ, अमळनेरच्या भक्तिसंगीताची उत्तम कामगिरी; मुक्ताईनगर येथील भजनसंध्येत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
![]()
आपण, करूया भक्तीचा महोत्सव ! कृष्ण जन्माष्टमी पर्वानिमित्त ‘कृष्णोत्सव’ भजन सेवाव्रती संमेलन २०२६ श्री नारायणी महिला मंडळ, अमळनेरच्या भक्तिसंगीताची उत्तम कामगिरी; मुक्ताईनगर येथील भजनसंध्येत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अमळनेर प्रतिनिधी : कृष्ण जन्माष्टमी पर्वानिमित्त ‘कृष्णोत्सव भजन सेवाव्रती संमेलन २०२६’ या भक्तिमय उपक्रमाचे आयोजन श्री कृष्णसखी महिला मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. ५ व ६ […]
संकल्प, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर उत्कर्षाची वैद्यकीय भरारी! ,दहावीत ९६.८० टक्के, नीट-२०२६ मध्ये ५७० गुण; नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश
![]()
संकल्प, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर उत्कर्षाची वैद्यकीय भरारी! दहावीत ९६.८० टक्के, नीट-२०२६ मध्ये ५७० गुण; नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश अमळनेर प्रतिनिधी “अडचणी कितीही आल्या तरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातत्याने प्रयत्न करत राहिले, तर यश नक्कीच मिळते,” या विचाराला आपल्या कर्तृत्वातून सार्थ ठरवत उत्कर्ष हरी माळी हिने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. […]
अमळनेर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी अभिषेक पाटील; उपाध्यक्षपदी वसुंधराताई लांडगे
![]()
अमळनेर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी अभिषेक पाटील; उपाध्यक्षपदी वसुंधराताई लांडगे अमळनेर प्रतिनिधी अमळनेर अमळनेर येथील दि अमळनेर को-ऑप अर्बन बँक लि.च्या अध्यक्षपदी श्री. अभिषेक (मोना) पाटील, तर उपाध्यक्षपदी सौ. वसुंधरा दशरथ लांडगे यांची सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेअकरा वाजता बँकेच्या सभागृहात बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा संचालक मंडळासह विविध […]
मोबाईल-टीव्हीपासून दूर, संस्कारांच्या वाटेवर! गजानन महाराज मंदिरात बालसंस्कार केंद्र सुरू
![]()
मोबाईल-टीव्हीपासून दूर, संस्कारांच्या वाटेवर! गजानन महाराज मंदिरात बालसंस्कार केंद्र सुरू अमळनेर प्रतिनिधी : आज दि. ६ सप्टेंबर, रविवार रोजी संत गजानन महाराज मंदिर येथे बालसंस्कार केंद्राचा शुभारंभ उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आला. गजानन परिवाराचे व पत्रकार ईश्वर महाजन सर यांच्या शुभहस्ते संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून या संस्कार केंद्राची सुरुवात […]
बासरीच्या सुरांत रंगला कृष्णजन्माचा सोहळा! ,आर.के. नगरात प्राचार्य पी. के. पाटील यांच्या निवासस्थानी जन्माष्टमी उत्साहात; आबासाहेब गोकुळ पाटील यांचे प्रभावी प्रबोधन
![]()
बासरीच्या सुरांत रंगला कृष्णजन्माचा सोहळा! आर.के. नगरात प्राचार्य पी. के. पाटील यांच्या निवासस्थानी जन्माष्टमी उत्साहात; आबासाहेब गोकुळ पाटील यांचे प्रभावी प्रबोधन अमळनेर प्रतिनिधी “कृष्ण सदा सहाय्यते!” या भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात आर.के. नगरातील प्राचार्य पी. के. पाटील यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री ८ […]
दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारला गोकुळातील बालकृष्णाचा दहीकाला सोहळा! , कृष्णगीतांवर उत्स्फूर्त नृत्य अन् दहीहंडीचा थरार; भारतीय संस्कृतीचा जिवंत आविष्कार
![]()
दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारला गोकुळातील बालकृष्णाचा दहीकाला सोहळा! कृष्णगीतांवर उत्स्फूर्त नृत्य अन् दहीहंडीचा थरार; भारतीय संस्कृतीचा जिवंत आविष्कार अमळनेर प्रतिनिधी महर्षी वाल्मिक आदिवासी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व. शंकरआप्पा रायसिंग निवासी मतिमंद विद्यालय, अमळनेर येथे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. भगवानजी तलवारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाल काला व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्हासात साजरा करण्यात […]
जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काळे मास्क बांधून मुकमोर्चा , आगामी निवडणुकात मतदानावर बहिष्कारचा इशारा , इच्छा मरणाची परवानगीची मागणी
![]()
जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काळे मास्क बांधून मुकमोर्चा आगामी निवडणुकात मतदानावर बहिष्कारचा इशारा , इच्छा मरणाची परवानगीची मागणी जळगाव प्रतिनिधी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व तदनंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या विनाअनुदानित , अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १९८२ प्रमाणे जुनी पेन्शन मिळण्यासाठी तोंडावर काळे मास्क लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. सुमारे सातशे शिक्षक […]
हिंगोणेतील एसटी बससेवा सुरळीत करण्याची मागणी, विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या गैरसोयींकडे NSUIने वेधले आगार प्रशासनाचे लक्ष
![]()
हिंगोणेतील एसटी बससेवा सुरळीत करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या गैरसोयींकडे NSUIने वेधले आगार प्रशासनाचे लक्ष अमळनेर, दि. ५ सप्टेंबर : अमळनेर तालुक्यातील हिंगोणे गावातील एसटी बससेवा नियमित करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह नागरिकांकडून होत आहे. बसफेऱ्या वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि ग्रामस्थांना प्रवास करताना अडचणी येत असल्याचे NSUIच्या शिष्टमंडळाने आगार प्रशासनाच्या निदर्शनास […]
शिक्षक दिन व दहीहंडीचा ‘दुग्ध-शर्करा’ योग! , रामेश्वर खुर्द येथे शिक्षक दिनासह गोपाळ काल्याचा उत्साह; विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत भक्ती, संस्कार व माणुसकीची पेरणी
![]()
शिक्षक दिन व दहीहंडीचा ‘दुग्ध-शर्करा’ योग! रामेश्वर खुर्द येथे शिक्षक दिनासह गोपाळ काल्याचा उत्साह; विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत भक्ती, संस्कार व माणुसकीची पेरणी अमळनेर प्रतिनिधी रामेश्वर खुर्द व रामेश्वर खुर्द बुद्रुक येथील जागृती अंगणवाडी आणि जिल्हा परिषद मराठी शाळेच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी व गोपाळ काल्याचा भव्य कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार […]

