आपण, करूया भक्तीचा महोत्सव ! , कृष्ण जन्माष्टमी पर्वानिमित्त ‘कृष्णोत्सव’ भजन सेवाव्रती संमेलन २०२६  श्री नारायणी महिला मंडळ, अमळनेरच्या भक्तिसंगीताची उत्तम कामगिरी; मुक्ताईनगर येथील भजनसंध्येत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
1 min read

आपण, करूया भक्तीचा महोत्सव ! , कृष्ण जन्माष्टमी पर्वानिमित्त ‘कृष्णोत्सव’ भजन सेवाव्रती संमेलन २०२६ श्री नारायणी महिला मंडळ, अमळनेरच्या भक्तिसंगीताची उत्तम कामगिरी; मुक्ताईनगर येथील भजनसंध्येत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

Loading

आपण, करूया भक्तीचा महोत्सव !

कृष्ण जन्माष्टमी पर्वानिमित्त ‘कृष्णोत्सव’ भजन सेवाव्रती संमेलन २०२६

श्री नारायणी महिला मंडळ, अमळनेरच्या भक्तिसंगीताची उत्तम कामगिरी; मुक्ताईनगर येथील भजनसंध्येत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

अमळनेर प्रतिनिधी : कृष्ण जन्माष्टमी पर्वानिमित्त ‘कृष्णोत्सव भजन सेवाव्रती संमेलन २०२६’ या भक्तिमय उपक्रमाचे आयोजन श्री कृष्णसखी महिला मंडळ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. ५ व ६ सप्टेंबर २०२६, शनिवार व रविवार रोजी श्री गणेश प्रस्थ मंगल कार्यालय, खामगाव रस्ता, शेगाव येथे हा भक्ती, सेवा आणि संस्कृतीचा महोत्सव रंगणार आहे.
या संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिक-लेखिका डॉ. श्रीमती ताराबाई भवालकर (पंढरपूर) यांचे आशीर्वाद लाभणार आहेत. भजन मंडळ संयोजिका (खानदेश/विदर्भ) श्रीमती कांताताई बोरा, भजन नियोजिका (पुणे शहर) श्रीमती जयश्रीताई रिसबुड, कार्यक्रम अध्यक्षा श्रीमती उर्मिलाताई भाटे, मंडळ अध्यक्षा श्रीमती मालतीताई भावसार तसेच कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी श्रीमती रोहिणीताई परांजपे (ह.भ.प.), नारदीय कीर्तनकार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मुक्ताईनगरच्या भजनसंध्येत प्रथम क्रमांकाचा मान

दरम्यान, श्री नारायणी महिला मंडळ, अमळनेर यांनी मुक्ताईनगर येथे आयोजित भजनसंध्या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. मंडळाला २१०० रुपये रोख, गजानन महाराजांचा ग्रंथ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या यशात मंडळाच्या अध्यक्ष पूजा पाटील, व सदस्य कल्पना पाटील, शोभा पाटील, मालती पाटील, मेघा पाटील, सुनीता पाटील आणि सुवर्णा पवार यांची उपस्थिती व सहभाग होता. त्यांच्या भक्तिसंगीताची छाप आजतागायत उत्तर महाराष्ट्रासह मुंबईतील श्रोत्यांवरही पडली असून, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

वाढदिवस, हळद, कानबाई, मेहंदी, देवीची गीते, लग्नकार्य तसेच विविध प्रकारच्या गाण्यांच्या कार्यक्रमांसाठी मंडळाकडून ऑर्डर स्वीकारल्या जातात.

“चला.. एकत्र येऊया, भक्ती, सेवा आणि संस्कृतीचा गौरव करूया!”

संपर्क : 9243311674

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *