मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती!  अमळनेरात जयनिल फाऊंडेशन आयोजित शाडू माती गणपती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
1 min read

मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती! अमळनेरात जयनिल फाऊंडेशन आयोजित शाडू माती गणपती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती!

अमळनेरात जयनिल फाऊंडेशन आयोजित शाडू माती गणपती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर:प्रतिनिधी-पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश रुजविण्यासाठी जयनिल फाऊंडेशन, अमळनेर तर्फे आज मराठा मंगल कार्यालय येथे भव्य तालुकास्तरीय शाडू माती गणपती कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
“मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती” या संदेशाने झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणरायाची मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पीओपीमुळे होणारे जलप्रदूषण टाळून निसर्ग संवर्धनाचा संदेश देणे हा मुख्य हेतू होता.

आमदार अनिल पाटील यांची उपस्थिती

या उपक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांशी गप्पा मारत त्यांनी संपूर्ण वेळ उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. “विद्यार्थ्यांच्या या उत्साहाने माझ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अशी मिळाली बक्षिसे-
बाल गट
प्रथम क्र.लावण्या काशिनाथ पाटील, दितीय क्र. श्रद्धा रविंद कदम, तृतीय क्र. जीविका राजेंद्र पाटील, चौथा क्र. आर्या जितेश पाटील, पाचवा क्र. कृतिका वैभव पवार

मोठा गट
प्रथम क्र.जयेश धनंजय हडप, दितीय क्र. हर्षवर्धन महेंद्र वाघ, तृतीय क्र.अनुष्का एकनाथ पाटील, चौथा क्र. कृतिका समाधान पारधी, पाचवा क्र. जानवी रवींद्र पाटील

बाल गट (१ ली ते ७ वी) व खुला गट अशा दोन गटात स्पर्धा झाली. दोन्ही गटात प्रथम – ३००० रु, द्वितीय – २००० रु, तृतीय – १००० रु अशी बक्षिसे व सर्व सहभागींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
हा उपक्रम जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व उपाध्यक्ष वरूण राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील, सरपंच राजश्री राजेश पाटील, संजय पुनाजी पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, जितू ठाकूर, किरण पाटील, पांडुरंग पाटील, विनोद कदम, राजेश पाटील, महेश पाटील, डॉ. बाविस्कर दांपत्य, गणेश भामरे, भूषण भदाणे, शेलकर सर, दुर्गेश पाटील, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व जयनिल फाऊंडेशनची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *