जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काळे मास्क बांधून मुकमोर्चा , आगामी निवडणुकात मतदानावर बहिष्कारचा इशारा , इच्छा मरणाची परवानगीची मागणी
1 min read

जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काळे मास्क बांधून मुकमोर्चा , आगामी निवडणुकात मतदानावर बहिष्कारचा इशारा , इच्छा मरणाची परवानगीची मागणी

Loading

जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काळे मास्क बांधून मुकमोर्चा

आगामी निवडणुकात मतदानावर बहिष्कारचा इशारा , इच्छा मरणाची परवानगीची मागणी

जळगाव प्रतिनिधी
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व तदनंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या विनाअनुदानित , अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १९८२ प्रमाणे जुनी पेन्शन मिळण्यासाठी तोंडावर काळे मास्क लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. सुमारे सातशे शिक्षक मोर्चात सहभागी झाले होते. निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
२००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन बंद चा निर्णय शासनाने २०१० मध्ये जाहीर केला मात्र यात २००५ पूर्वी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना देखील पेन्शन नाकारले तर २००५ पूर्वी जाहिरात असताना २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्यात आले नैसर्गिक न्यायतत्वानुसार हा अन्याय असल्याने जिल्हयातील सुमारे ७०० कर्मचाऱ्यांनी माध्यमिक पतपेढी पासून मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला. त्याठिकाणी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व विधानसभेत घोषणा करून देखील अमलबाजवणी नाही.
निवेदनात म्हटले आहे की २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत शासनाने १९८२ प्रमाणे जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात आदेश निर्गमित करावेत अन्यथा २८ सप्टेंबर २०२६ पासून मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. पुढच्या २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून आमरण उपोषण करण्यात येईल , आगामी येणाऱ्या निवडणूकांवर शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी , पदवीधर विद्यार्थी , पालक आणि कुटुंब मतदानावर बहिष्कार टाकू , पेन्शन देत नसाल तर राज्यातील २६ हजार कर्मचाऱ्यांना इच्छामरणाची परवानगी द्यावी असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी राज्यसमन्वयक शिक्षक नेते संभाजी पाटील , डॉ शांताराम पाटील , जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील , विनाअनुदानीत संघटनेचे नाना पाटील , मुख्याध्यापक संघटनेचे रवींद्र पाटील , ललीतकुमार चौधरी , शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे रवींद्र पाटील , मुख्याध्यापक संघटनेचे विद्या सचिव प्रकाश पाटील, अमळनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील , जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास पाटील , ईश्वर महाजन ,एच.ओ.माळी, अशोक सूर्यवंशी , महिला संघटनेच्या सुषमा सोनवणे , शीतल चव्हाण , सीमा मोरे , सीमा पाटील , प्रवीण पाटील , मुख्यध्यपक संघटनेचे तालुका अध्यक्ष जे के पाटील , सचिन पाटील यांच्यासह मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *