थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 19:08
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र विशेष बातमी

जिभाऊ अन् मोठ्या भावांच्या संवादातून ग्रामीण वास्तवाचे दर्शन; ‘भीक ना भाऊ’ वाचकांच्या भेटीला

जिभाऊ अन् मोठ्या भावांच्या संवादातून ग्रामीण वास्तवाचे दर्शन; ‘भीक ना भाऊ’ वाचकांच्या भेटीला
थोडक्यातजिभाऊ अन् मोठ्या भावांच्या संवादातून ग्रामीण जीवनाचे वास्तव उलगडणारे ‘भीक ना भाऊ’ हे गोकुळ बागूल यांचे अहिराणी ललित लेखसंग्रह वाचकांच्या भेटीला येत आहे. दै. देशदूतमधील साप्ताहिक सदरातील १५ लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. जिभाऊ आणि मोठा भाऊ या दोन पात्रांच्या संवादातून ग्रामीण समस्या, सामाजिक विसंगती, लोकप्रतिनिधींची अनास्था, शासकीय यंत्रणेतील त्रुटी आणि सामान्य माणसाच्या मानसिकतेवर लेखकाने अहिराणी बोलीतून मार्मिक भाष्य केले आहे. खान्देशी मायबोलीचा गंध आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव जपणारा हा संग्रह नव्या पिढीला अहिराणी भाषेशी जोडणारा ठरेल. पुस्तक प्रकाशन : २९ नोव्हेंबर २०२६, नांदी साहित्य संमेलन, अमळनेर. लेखक : गोकुळ बागूल शब्दांकन : प्रा. बी. एन. चौधरी, धरणगाव प्रकाशक : कस्तुरी प्रकाशन, अमळनेर किंमत : ₹१८०

"भीक ना भाऊ"

गोकुळ बागूल यांचे अहिराणी ललित आज दिनांक 29/ 11/ 26 रोजी "नांदी साहित्य संमेलनात " अमळनेर येथे प्रकाशित होत आहे . अहिराणी पुस्तकाचा परिचय :-

पूर्वीच्या काळी गाव, खेड्यातून चौका चौकात पार, ओट्यावर गावकऱ्यांची एकमेकांमध्ये चर्चा रंगाची. या चर्चेत समवयस्क किंवा वडीलधाऱ्या सोबत तरुणांच्या ही गप्पा रंगाच्या. या गप्पांना गावगाड्यातील विषय चर्चेत असायचे. ह्या सोबत तालुका पातळी, जिल्हा पातळी, राज्यपातळीवर घडणाऱ्या घटनांची देखील दखल घेतली जायची. जी पूर्णपणे साधक बाधक सर्वांगाने विचार करणारी, कोणताही दूषित पूर्वग्रह मनात न ठेवणारी आणि एकमेकांचे प्रबोधन करणारी असायची.

या चर्चेतून बऱ्याचदा सकारात्मक फलित हाती लागायचे आणि त्यातून इतरांचे प्रबोधन व्हायचे. आज व्हाट्सअप ,फेसबुक सारख्या समाज माध्यमावर जी वायफळ चर्चा रंगते,त्याहून गाव गाड्यातील अशा चर्चा फायद्याच्या होत्या .त्या सकारात्मक, वाईट चालीरीतीवर बोट ठेवणाऱ्या आणि गावकऱ्यांच्या मनातील द्वंद्व मिटवणाऱ्या असायच्या !

अशाच काही गाव गप्पा अमळनेर येथील लेखक गोकुळ बागूल यांनी "भीक ना भाऊ "या अहिराणी ललित लेख संग्रहातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे .दै. देशदूत मध्ये त्यांनी लिहिलेल्या साप्ताहिक सदरातील हे लेख असून खानदेशातील बोलीभाषा अहिराणीतून ते लिहिलेले आहेत .त्यामुळे या लेखांना माय -मातीच्या गंध आणि मायबोलीच्या अनुबंध लाभला आहे. एकूण 15 लेखांची ही लेक मालिका पुस्तकाच्या स्वरूपात संकलित झाल्याने ग्रामीण जीवनाच्या आलेख च मायबोलीच्या रूपाने संग्रहित झाला आहे .जो नव्या पिढीला आपल्या अहिराणी बोलीशी आपुलकीने जोडून ठेवेल ."भिक ना भाऊ" या संग्रहातील लेखांची शीर्षक वाचली तरी लेखकाच्या सर्व समावेशक वृत्तीची दर्शन घडते. गाव गाड्यात घडणाऱ्या दैनंदिनी घटना, घडामोडींची समाजाशी आणि शहरी लोकांशी घातलेली सांगड म्हणजे ह्या लेखांमधील संवाद आहेत. यासाठी लेखकाने दोन पात्र उभी केली असून जिभाऊ आणि मोठा भाऊ या दोघांच्या एकमेकांच्या संवादातून त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या मनात डोकावणाऱ्या शंका कुशंका, भेडसावणाऱ्या समस्या, लोकप्रतिनिधींची अनास्था, शासकीय कर्मचाऱ्यांची लुबाडणूक, सर्वसामान्य माणसाच्या बोटचेपेपणा आणि कधीही ठोस भूमिका न घेण्याची मानसिकता यावर रोखठोक शब्दात परखड भाष्य केलेले आहे. लेखातील अहिराणी भाषेतील काही शब्द वाक्यप्रचार म्हणी इतके चपखल योजले आहेत की, त्यातून ग्रामीण जीवनाचे भेदक वास्तव दर्शन घडते .

यातून लेखकाची आपल्या मायबोली अहिराणी बाबतची आस्था, अभ्यास आणि तिच्या प्रती असलेली ऋणानुबंध व्यक्त होतानां दिसते.

अमळनेर येथील गोकुळ बागूल यांचे हे अहिराणी लेखांचे पुस्तक वाचकांच्या पसंतीला पडेल यात शंकाच नाही. आज दिनांक 29/ 11/ 26 रोजी हे अहिराणी पुस्तक अमळनेर येथे "नांदी साहित्य संमेलनात" प्रकाशित होत आहे .त्याबद्दल लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन!

शब्दाकंन

प्रा. बी एन चौधरी

धरणगाव.

मो.9423492593

प्रकाशक:-

कस्तुरी प्रकाशन

अमळनेर.

पुस्तकाचे नाव: भिकना भाऊ

कि.180 /-

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 7 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 27 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 10 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 2 तासांपूर्वी 10 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 6 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 7 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 27 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 10 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 18