थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 20:54
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र विशेष बातमी

अमळनेरच्या लेकीची वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग झेप! ‘एमबीबीएस’नंतर ‘एमडी’मध्येही विशेष प्रावीण्य; डॉ. कल्याणी पाटील यांच्या कर्तृत्वाचा गौरव

अमळनेरच्या लेकीची वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग झेप! ‘एमबीबीएस’नंतर ‘एमडी’मध्येही विशेष प्रावीण्य; डॉ. कल्याणी पाटील यांच्या कर्तृत्वाचा गौरव

अमळनेर प्रतिनिधी: योग्य ध्येय, सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि शिक्षणाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, हे डॉ. कल्याणी सुरेंद्र पाटील यांनी आपल्या यशातून सिद्ध केले आहे. एमबीबीएसनंतर न्यूरो सायकॅट्रिक विषयात एमडी ही पदवी विशेष प्राविण्यासह संपादन करून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले आहे.

डॉ. कल्याणी पाटील या खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळा, अमळनेर येथील माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांनी माध्यमिक शिक्षण याच शाळेत, तर बारावीपर्यंतचे शिक्षण प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे पूर्ण केले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पुढे मणिपाल विद्यापीठ, सिक्कीम येथे एमडी पदवी विशेष प्राविण्यासह संपादन करून आपल्या शैक्षणिक प्रवासात आणखी एक मानाचा टप्पा गाठला.

डॉ. कल्याणी या श्री. सुरेंद्र दयाराम सूर्यवंशी (निवृत्त मुख्याध्यापक, चिमणपुरी पिंपळे हायस्कूल) आणि सौ. सीमा सुरेंद्र सूर्यवंशी (मुख्याध्यापिका, श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळा, अमळनेर) यांच्या सुकन्या आहेत. तसेच त्या श्री. अभिजीत राजेंद्र पाटील (आयएएस), अतिरिक्त जिल्हाधिकारी, गंगटोक (सिक्कीम) यांच्या धर्मपत्नी असून सौ. मंदाताई व श्री. राजेंद्र चिंतामण पाटील (सेवानिवृत्त वजन-माप अधिकारी) यांच्या स्नुषा आहेत.शिक्षणाचा भक्कम पाया, कुटुंबाचे प्रोत्साहन आणि स्वतःच्या कर्तृत्वावर असलेला विश्वास यांच्या जोरावर डॉ. कल्याणी यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे अमळनेरच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव वाढला असून विद्यार्थिनींसाठी त्या प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत.

डॉ. कल्याणी पाटील यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

ध्येय मोठे असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील, तर यशाची उंची गाठता येते, याचे डॉ. कल्याणी पाटील या उत्तम उदाहरण आहेत.


शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 7 तासांपूर्वी 123 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 9 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 11 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 12 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 13 तासांपूर्वी 90

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 4 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 7 तासांपूर्वी 123 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 8 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 9 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 11 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 12 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 13 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 20