![]()
धरणगाव प्रतिनिधी
अहिल्याबाई होळकर कर्ज माफी योजना आणि दुष्काळ या गंभीर विषयावर मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या शी सखोलपणे अशी चर्चा झाली.काही विषय जिल्ह्यावर सुटणारे आहेत,बाकी शासन स्तरावरचे आम्ही अहवाल पाठवतो.खालील मागण्या आम्ही मांडल्या.
दुष्काळ ग्रस्तांना मिळणारी ५ हजार ॲग्रीम रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाली नाही ती देण्यात यावी.दुष्काळग्रस्तांना संपूर्ण अनुदान तात्काळ देण्यात यावे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेत २ लाखांचा लाभ तांत्रिकदृष्ट्या बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही तरी वंचित शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा,नियमित शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान तात्काळ मिळावे,सन २०१५/१६ सालातील वगळलेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेत समावेश करून २ लाखांचा लाभ मिळावा,मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांना कर्जमाफी योजनेत समाविष्ट करुन संबंधित कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी,लाडकी बहीण योजना ई केवायसी मुळे वंचित महिलांना साइड सुरू करुन लाभ देण्यात यावा,संजय गांधी निराधार योजनेची ४/५ महीण्यापासुन मिटीग नसल्याने पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत ,तरी प्रांताधिकार्यानी त्वरित बैठक घेऊन पात्र लाभार्थ्यांना न्याय देण्यात यावा,दुष्काळाचे भिषण गांभीर्य असल्याने शेतकरी तसेच मजूरांसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे तातडीने सुरू करावीत,भविष्यातील चारा तसेच पाणी टंचाई संदर्भात शासनाला आराखडा सादर करावा,धरणगाव तालुक्यातील संपूर्ण गावात शेतकऱ्यांसाठी शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ते व नदी नाल्यांवर बंधारे बांधण्यात यावेत.
या प्रसंगी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांची भेट घेऊन मागण्या विषयी सविस्तर चर्चा झाली, व मागण्यांचे निवेदन या वेळी देण्यात आले त्याप्रसंगी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, , नगराध्यक्ष, युवा सेना जिल्हाप्रमुख, निलेश चौधरी , तालुका प्रमुख जयदीप बापू पाटील , शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक भागवत चौधरी , नगरसेवक सुनील चौधरी, नगरसेवक परमेश्वर महाजन, शेतकरी सेना तालुका प्रमुख विजय पाटील , युवा सेना तालुकाप्रमुख स्वप्निल परदेशी,शुभम पवार, ज्ञानेश्वर महाजन, राहुल रोकडे, विलास पवार, अक्षय शेठ मुथा ,गोपाल महाजन, भीमराव धनगर ,जिभाऊ पाटील, जीवन भोई, शामराव महाजन, रियाज बागवान , गजानन महाजन,वसीम खान सचिन चव्हाण , फिरोज खान,दिलीप महाजन, सुनील सोनार, गोविंदा पाटील, नंदू भाऊ करोशिया, शरद शिरसाट, प्रसिद्धी प्रमुख गजानन महाजन,अरविंद चौधरी, तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, शिवसैनिक,शेतकरी बांधव उपस्थित होते.
प्रतिक्रिया (0)