थेट बातम्यांकडे जा
रविवार, 29 नोव्हें 2026 20:35
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
2:34 PMसमतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल येथे २६ पुस्तकां… 11:29 AM२०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्देशीय संस्था व ज… 4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी…
महाराष्ट्र विशेष बातमी

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते नव्या वर्गखोल्यांचे उद्घाटन; साने गुरुजी विद्यालयाने जपली कृतज्ञतेची परंपरा! ,निवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून विद्यालयाने दिला आदर्श; पाच नवीन वर्गखोल्यांची विद्यार्थ्यांना भेट

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते नव्या वर्गखोल्यांचे उद्घाटन; साने गुरुजी विद्यालयाने जपली कृतज्ञतेची परंपरा!    ,निवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान करून विद्यालयाने दिला आदर्श; पाच नवीन वर्गखोल्यांची विद्यार्थ्यांना भेट

अमळनेर प्रतिनिधी :

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित साने गुरुजी विद्यामंदिर (प्राथमिक) येथे इयत्ता पहिली ते सातवीचे ३५ वर्ग विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या सोयीसाठी एकाच सत्रात भरविण्याच्या दृष्टीने संस्थेच्या वतीने पाच नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे व सर्व संचालक मंडळाच्या नियोजनातून साकारलेल्या या वर्गखोल्यांचे उद्घाटन संस्थेतील निवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना उद्घाटनाचा मान देऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी प्राथमिक विभागाच्या माजी मुख्याध्यापिका सौ. शिंदे मॅडम, माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे, उपशिक्षक विलास चौधरी, एस. एम. महाजन, शिक्षकेतर कर्मचारी ज्ञानेश्वर शिंगाणे, प्रकाश बडगुजर व सुशीलाबाई वाणी यांचा सन्मान करण्यात आला.

तसेच वर्गखोल्यांचे बांधकाम करणारे गौतम मोरे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, सहसचिव अशोक बाविस्कर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजीव पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील पाटील, कन्या हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. ए. धनगर यांच्यासह संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

नवीन वर्गखोल्यांच्या उभारणीसोबतच जुन्या सहकाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करण्याची संस्थेची ही भूमिका शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरली. विकासासोबत माणुसकी आणि कृतज्ञतेची नाळ जपणाऱ्या साने गुरुजी विद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र समतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल ये… 6 तासांपूर्वी 1.1K महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे काल 202 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! काल 93 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! काल 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ काल 43 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… काल 50

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

महाराष्ट्र समतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल ये… 6 तासांपूर्वी 1.1K खान्देश २०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्दे… 9 तासांपूर्वी 72 खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… काल 90 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे काल 202 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… काल 43 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! काल 93 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! काल 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ काल 43 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… काल 50 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… काल 111 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… 2 दिवसांपूर्वी 39 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा 2 दिवसांपूर्वी 13