![]()
अमळनेर प्रतिनिधी
स्थानिक पत्रकारिता जिवंत ठेवणे, समाजातील प्रत्येक महत्त्वपूर्ण घडामोडीला तत्परतेने प्रसिद्धी देणे आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाला समाजासमोर आणणे, ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मराठी लाईव्ह न्यूजचे संपादक ईश्वर महाजन समर्थपणे पार पाडत आहेत. उत्तम पत्रकारिता हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी निर्माण केलेली विश्वासार्हता आणि जनसंपर्क ही त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. मराठी लाईव्ह न्यूजची दिवसेंदिवस उंचावत असलेली वाटचाल निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार आदिवासी विकास महामंडळाचे उपायुक्त कपिल पवार यांनी काढले.
मराठी लाईव्ह न्यूजच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘सन्मान कर्तृत्वाचा – प्रेरणापर्व २०२६’ या सोहळ्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी अमळनेर येथील इंदिरा भवनात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
![]()
स्थानिक पत्रकारितेचा विश्वासार्ह चेहरा म्हणून मराठी लाईव्ह न्यूजची ओळख!
आपल्या मनोगतात कपिल पवार यांनी मराठी लाईव्ह न्यूजच्या गेल्या काही वर्षांतील वाटचालीचा गौरवपूर्ण आढावा घेतला. ते म्हणाले की, मराठी लाईव्ह न्यूजच्या संपर्कात आम्ही गेल्या चार-पाच वर्षांपासून आहोत. या काळात ईश्वर महाजन यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेली नाळ आणि स्थानिक प्रश्नांबाबत दाखवलेली तत्परता अनुभवली आहे. उत्तम आणि दर्जेदार पत्रकारिता करणे हे त्यांचे ध्येय असून स्थानिक पत्रकारितेचे अस्तित्व आणि महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
![]()
आजच्या वेगवान युगात अद्ययावत घडामोडी, महत्त्वाचे प्रसंग आणि स्थानिक पातळीवरील बातम्या तातडीने जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम मराठी लाईव्ह न्यूज करीत आहे. कोणताही कार्यक्रम असो, त्याची इत्यंभूत माहिती आणि बातमी तत्परतेने वाचकांपर्यंत पोहोचविण्याची कार्यपद्धती त्यांनी विकसित केली आहे. महापुरुषांच्या विचारांपासून प्रेरणा घेत पत्रकारितेची सामाजिक भूमिका जपण्याचे काम मराठी लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून होत आहे.
![]()
अफाट जनसंपर्क आणि सर्वसमावेशक विचारांची जोड!
ईश्वर महाजन यांनी सर्व स्तरांतील लोकांशी चांगले संबंध जपले आहेत. विविध विचारधारा, सामाजिक प्रवाह आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांशी नाळ जोडत त्यांनी मराठी लाईव्ह न्यूजला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. त्यांचा जनसंपर्क अफाट असून समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाण्याची त्यांची हातोटी विशेष उल्लेखनीय आहे.
विकास मंच ही संकल्पना समाजासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कामही मराठी लाईव्ह न्यूजने केले आहे. स्थानिक विकासाच्या प्रश्नांना व्यासपीठ देणे, सामाजिक उपक्रमांना प्रसिद्धी देणे आणि सकारात्मक काम करणाऱ्या व्यक्तींच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे, ही या माध्यमाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
आजच्या काळात चांगल्या कामाचे कौतुक करणाऱ्यांची संख्या कमी होत असताना मराठी लाईव्ह न्यूजने आपली सकारात्मक प्रतिमा जपली आहे. समाजातील चांगल्या कामांची दखल घेणे, कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे ही केवळ पत्रकारिता नसून समाजाला प्रेरणा देणारी चळवळ आहे.
![]()
सन्मानातून कर्तृत्वाला नवी ऊर्जा!
‘सन्मान कर्तृत्वाचा’ या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना कपिल पवार म्हणाले की, ज्या व्यक्तींना आज सन्मानित करण्यात आले आहे, त्यांनी आपल्या कार्यातून लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. अशा व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या सामाजिक योगदानाला मान्यता देण्यासोबतच भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठी ऊर्जा देणे होय.
![]()
अमळनेर तालुका विविध क्षेत्रांत चांगल्या प्रकारे पुढारलेला असून येथे अनेक गुणवंत, कर्तृत्ववान आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आहेत. अशा व्यक्तींना शोधून त्यांचे कार्य समाजासमोर आणणे आणि त्यांचा गौरव करणे हे मराठी लाईव्ह न्यूजचे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे.
ईश्वर महाजन यांचे कर्तृत्व केवळ शब्दांतून नव्हे, तर त्यांच्या कृतीतून निर्माण झालेले आहे. त्यांनी आपल्या कार्यातून मिळवलेली विश्वासार्हता, सामाजिक संपर्क आणि पत्रकारितेतील सातत्य हीच त्यांच्या यशाची खरी पावती आहे, असेही कपिल पवार यांनी नमूद केले.
![]()
विचारपीठावर मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. डिगंबर महाले होते. विचारपीठावर आदिवासी विकास महामंडळाचे उपायुक्त कपिल पवार, नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयदीप पाटील, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश भदाणे, अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि मराठी लाईव्ह न्यूजचे संपादक ईश्वर महाजन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपायुक्त कपिल पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी संपादक ईश्वर महाजन यांनी प्रास्ताविकातून मराठी लाईव्ह न्यूजच्या सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा मांडला. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेल्या दीपावली विशेष स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
![]()
अकरा कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा गौरव
‘सन्मान कर्तृत्वाचा – प्रेरणापर्व २०२६’ या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकरा व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला.
१. विद्या दीदी – प्रजापिता ब्रह्माकुमारी, अमळनेर (आध्यात्मिक व मूल्याधिष्ठित समाजप्रबोधन).
२. प्रा. डॉ. वासुदेव राजाराम पाटील (शैक्षणिक).
३. डॉ. शरद बाविस्कर – बालरोगतज्ज्ञ (वैद्यकीय सेवा व कला).
४. प्रवीण माळी – ‘आयतं पोयतं सख्यान’चे निर्माते (शैक्षणिक व सामाजिक).
५. प्रा. डॉ. लीलाधर पाटील (शिक्षण, उत्कृष्ट व्याख्याते व सामाजिक प्रबोधन).
६. श्रीमती अनिताताई बोरसे – मुख्याध्यापिका, साने गुरुजी कन्या हायस्कूल (शैक्षणिक).
७. राजेंद्र वाणी (उद्योग).
८. प्रमोद पाटील चिलानेकर (पत्रकारिता).
९. श्रीमती रेणू प्रसाद – कार्यकारी संचालक, आधार संस्था (सामाजिक).
१०. नारायणी महिला मंडळ, अमळनेर (धार्मिक व सामाजिक).
११. पातोंडा परिसर विकास मंच (सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणीय विकास).
या सर्व सन्मानार्थींचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.
![]()
मान्यवरांची उपस्थिती आणि उत्स्फूर्त प्रतिसाद
या सोहळ्याला शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळमसरे परिसरातील मान्यवरांसह प्रजापिता ब्रह्माकुमारी अमळनेर केंद्रातील अनेक भगिनी व बंधू उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बहारदार आणि प्रभावी सूत्रसंचालन अमळनेर अर्बन बँकेच्या चेअरमन वसुंधरा दशरथ लांडगे यांनी केले. आपल्या ओघवत्या वाणीने त्यांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
![]()
सोहळ्याच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डिझायनर लक्ष्मीकांत सोनार, जगदीश महाजन, गौरव पाटील, वेदांत माळी, श्रेयस माळी, रिल स्टार तरुण गुरव, समीर, मधुकर बाळापुरे, भूपेंद्र आणि हिमांशू यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच इंदिरा भवनचे मालक राजू दादा वाणी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मोलाचे सहकार्य केले.
पत्रकारिता केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित न ठेवता समाजातील कर्तृत्वाचा गौरव करणारे व्यासपीठ निर्माण करणे, ही मराठी लाईव्ह न्यूजची खरी उपलब्धी आहे. ईश्वर महाजन यांनी आपल्या कृतीतून निर्माण केलेली ही ओळख आणि सात वर्षांची वाटचाल निश्चितच प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत कपिल पवार यांनी मराठी लाईव्ह न्यूजच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
![]()
प्रतिक्रिया (0)