“
![]()
अमळनेर प्रतिनिधी
पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या देण्याचे माध्यम नव्हे, तर समाजाला दिशा देणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे आणि चांगल्या विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे प्रभावी माध्यम आहे. माध्यमाचा आकार लहान असो अथवा मोठा, त्याच्या कार्याची उंची ही त्यातील पत्रकारितेच्या गुणवत्तेवर ठरत असते. आज चांगली आणि निर्भीड पत्रकारिता करणे आव्हानात्मक झाले असताना ईश्वर महाजन यांनी सातत्याने चांगली पत्रकारिता जोपासली आहे, ही अभिमानाची बाब आहे, अमळनेर येथील इंदिरा भवन येथे होणाऱ्या सन्मान कर्तुत्वाचा 2026 या मराठी लाईव्ह न्युज च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त
असे प्रतिपादन व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. दिगंबर महाले यांनी केले.
![]()
मराठी लाईव्ह न्यूजच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘सन्मान कर्तृत्वाचा – प्रेरणापर्व २०२६’ या भव्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी अमळनेर येथील इंदिरा भवनात हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. दिगंबर महाले, उद्घाटक आदिवासी विकास महामंडळाचे उपायुक्त कपिल पवार, नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयदीप पाटील, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश भदाणे, अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि मराठी लाईव्ह न्यूजचे संपादक ईश्वर महाजन उपस्थित होते.
![]()
अध्यक्षीय मनोगत : पत्रकारितेचा आकार नव्हे, तर कर्तृत्वाचा ठसा महत्त्वाचा!
अध्यक्षीय भाषणात डॉ. दिगंबर महाले यांनी पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी, व्यक्तिमत्त्व विकास आणि माणसे जोडण्याच्या कलेवर अत्यंत मार्मिक भाष्य केले.
ते म्हणाले की, मराठी लाईव्ह न्यूजचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पाहिला, तर एखाद्या मोठ्या वृत्तपत्राच्या कार्यक्रमापेक्षाही अधिक नियोजनबद्ध आणि दिमाखदार पद्धतीने तो साजरा होत असल्याचे दिसते. ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या काळात चांगली पत्रकारिता करणे सोपे राहिलेले नाही. अनेक आव्हानांना सामोरे जात आपली भूमिका निर्भीडपणे मांडावी लागते. मात्र पत्रकारिता कधीही लहान किंवा मोठी नसते. माध्यमाचे स्वरूप नव्हे, तर त्यातून समाजासाठी काय घडते, हे अधिक महत्त्वाचे असते.
कर्नाटकातील राजकीय घडामोडींचे उदाहरण देताना त्यांनी एका सामान्य पोर्टलच्या पत्रकाराने आपल्या पत्रकारितेच्या ताकदीवर सत्तेची समीकरणे बदलण्याइतका प्रभाव निर्माण केल्याचा दाखला दिला. यातून माध्यमांची ताकद आणि पत्रकारितेचे सामर्थ्य किती मोठे असू शकते, हे स्पष्ट होते.
ईश्वर महाजन यांच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले, ईश्वर महाजन यांनी चांगली पत्रकारिता जोपासली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे चांगली माणसे जोडण्याचे कसब. समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना शोधणे, त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याला समाजासमोर आणणे ही मोठी गोष्ट आहे. ईश्वर महाजन यांना सन्मानासाठी योग्य व्यक्तींची निवड करता येते, हे त्यांच्या सुंदर विचारांचे आणि व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.
डॉ. बाविस्कर यांच्यासारख्या सुंदर मनाच्या आणि सुंदर विचारांच्या व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख करत त्यांनी समाजात माणुसकी जपणाऱ्या व्यक्तींचे महत्त्व अधोरेखित केले.
पत्रकार आणि समाजातील इतर घटक यांच्यातील संबंधांवर भाष्य करताना त्यांनी मिश्कील पण अर्थपूर्ण शब्दांत सांगितले की, पत्रकाराशी मैत्री करू नये असे नाही; मात्र त्याच्याशी दुश्मनीही करू नये. कारण पत्रकारिता ही समाजातील चांगल्या-वाईट गोष्टींवर प्रकाश टाकणारी ताकद आहे. स्वतःच्या सन्मानापेक्षा समाजात मिळणारा विश्वास आणि प्रतिष्ठा अधिक महत्त्वाची आहे.
आपल्या आणि ईश्वर महाजन यांच्या नात्याबद्दल बोलताना त्यांनी अत्यंत आपुलकीने सांगितले की, जिवंत माणसांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे. चांगल्या आणि नेक कामामागे प्रामाणिक भावना असतील, तर ईश्वरही अशा कार्याला साथ देतो.
![]()
भाषणाच्या शेवटी त्यांनी जीवनातील संघर्ष आणि जिद्दीचे महत्त्व अधोरेखित करत शेर सादर केला,
**“यहाँ तो हर ज़ख्मी परिंदा है,
जो उड़ गया वही ज़िंदा है!”**
या ओळींतून संघर्षाला न घाबरता पुन्हा उभे राहणाऱ्या आणि परिस्थितीवर मात करून यशाची झेप घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी प्रेरणादायी संदेश दिला. त्यांच्या संपूर्ण अध्यक्षीय मनोगतातून पत्रकारितेची ताकद, माणसे जोडण्याचे कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. उपस्थितांनी त्यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
![]()
मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन
कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी विकास महामंडळाचे उपायुक्त कपिल पवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी मराठी लाईव्ह न्यूजचे संपादक ईश्वर महाजन यांनी प्रास्ताविकातून मराठी लाईव्ह न्यूजच्या सात वर्षांच्या वाटचालीचा आढावा मांडला.
स्थानिक प्रश्नांपासून शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींपर्यंत प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विषयांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या सात वर्षांत करण्यात आला. समाजातील सकारात्मक कार्य, गुणवंत व्यक्तींचे कर्तृत्व आणि दुर्लक्षित घटकांचे प्रश्न जनतेसमोर मांडण्याचा संकल्प यापुढेही कायम राहील, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या दीपावली विशेष स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेत विविध क्षेत्रांतील लेखन, विचार, सामाजिक योगदान आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा वेध घेण्यात आला आहे.
![]()
अकरा कर्तृत्ववान व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान
‘सन्मान कर्तृत्वाचा – प्रेरणापर्व २०२६’ या उपक्रमांतर्गत शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक, आध्यात्मिक, औद्योगिक, पत्रकारिता, धार्मिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकरा व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला.
१. **विद्या दीदी – प्रजापिता ब्रह्माकुमारी, अमळनेर**
कार्य क्षेत्र : आध्यात्मिक व मूल्याधिष्ठित समाजप्रबोधन.
२. **प्रा. डॉ. वासुदेव राजाराम पाटील**
कार्य क्षेत्र : शैक्षणिक.
३. **डॉ. शरद बाविस्कर – बालरोगतज्ज्ञ**
कार्य क्षेत्र : वैद्यकीय सेवा व कला.
४. **प्रवीण माळी – ‘आयतं पोयतं सख्यान’चे निर्माते**
कार्य क्षेत्र : शैक्षणिक व सामाजिक.
५. **प्रा. डॉ. लीलाधर पाटील**
कार्य क्षेत्र : उत्कृष्ट व्याख्याते, शिक्षण व सामाजिक प्रबोधन.
६. **श्रीमती अनिताताई बोरसे – मुख्याध्यापिका, साने गुरुजी कन्या हायस्कूल**
कार्य क्षेत्र : शैक्षणिक.
७. **राजेंद्र वाणी**
कार्य क्षेत्र : उद्योग.
८. **प्रमोद पाटील चिलानेकर**
कार्य क्षेत्र : पत्रकारिता.
९. **श्रीमती रेणू प्रसाद – कार्यकारी संचालक, आधार संस्था**
कार्य क्षेत्र : सामाजिक.
१०. **नारायणी महिला मंडळ, अमळनेर**
कार्य क्षेत्र : धार्मिक व सामाजिक.
११. **पातोंडा परिसर विकास मंच**
कार्य क्षेत्र : सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणीय विकास.
![]()
या सर्व सन्मानार्थींनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि पुस्तक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा मिळण्यासोबतच समाजातील इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे.
![]()
मान्यवरांची उपस्थिती आणि उत्स्फूर्त प्रतिसाद
या सोहळ्याला शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळमसरे परिसरातील मान्यवरांनीही कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली. प्रजापिता ब्रह्माकुमारी अमळनेर केंद्रातील अनेक भगिनी व बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बहारदार आणि प्रभावी सूत्रसंचालन अर्बन बँकेच्या चेअरमन वसुंधरा दशरथ लांडगे यांनी केले. आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरणात बांधून ठेवले.
![]()
पडद्यामागील हातांचेही कौतुक
कोणताही मोठा सोहळा यशस्वी होण्यासाठी पडद्यामागे अनेक हात अविरत मेहनत घेत असतात. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डिझायनर लक्ष्मीकांत सोनार, जगदीश महाजन, गौरव पाटील, वेदांत माळी, श्रेयस माळी, रिल स्टार तरुण गुरव, समीर, मधुकर बाळापुरे, भूपेंद्र, हिमांशू यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच इंदिरा भवनचे मालक राजू दादा वाणी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने कार्यक्रमासाठी सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक पार पडले.
![]()
सात वर्षांची वाटचाल आणि पुढील प्रेरणापर्व!
सात वर्षांपूर्वी सुरू झालेला मराठी लाईव्ह न्यूजचा प्रवास आज समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या उपक्रमापर्यंत पोहोचला आहे. बातमीच्या पलीकडे जाऊन माणसांचे कर्तृत्व समाजासमोर आणणे, चांगल्या कामाची दखल घेणे आणि नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करणे, ही या उपक्रमाची खरी ओळख ठरत आहे.
![]()
‘सन्मान कर्तृत्वाचा – प्रेरणापर्व २०२६’ हा केवळ पुरस्कार वितरणाचा सोहळा नव्हता, तर समाजासाठी निःस्वार्थपणे काम करणाऱ्या हातांचा, विचारांचा आणि संघर्षमय यशोगाथांचा सन्मान होता. एका पत्रकाराने आपल्या लेखणीच्या माध्यमातून माणसे जोडत, त्यांच्या कार्याला व्यासपीठ देत उभा केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.
कारण सन्मान हा केवळ व्यक्तीचा नसतो, तर त्या व्यक्तीने आयुष्यभर जपलेल्या विचारांचा, केलेल्या संघर्षाचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा असतो. मराठी लाईव्ह न्यूजची सात वर्षांची वाटचाल याच सकारात्मक विचारांची साक्ष देणारी ठरली!
कार्यक्रमानंतर मराठी लाईव्ह न्युज संपादक ईश्वर महाजन, ज्योती महाजन यांचे सर्व वाचक जाहिरातदार, मित्रपरिवार यांनी सत्कार करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
![]()
कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रमुख एडवोकेट शुभांगी पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ, प्रताप कॉलेजचे माजी उपप्राचार्य प्राध्यापक डॉ एस.ओ माळी, हिंदी विभागाचे प्रमुख सेवानिवृत्त प्राध्यापक सुरेश माहेश्वरी, हिंदी मंडळाचे सचिव दिलीप पाटील,
महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बापू माळी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे युवा अध्यक्ष अमोल माळी
सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, ग.स.चे माजी उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, वत्साई एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत भदाणे, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक आर. आर. सोनवणे, सोनगिरचे सेवानिवृत्त एसटी कंडक्टर एस.एल माळी साने गुरुजी कन्या हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. ए. धनगर, काँग्रेसचे एन एस यु आयचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट कौस्तुभ पाटील व सहकारी मित्र,
देवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, रणाईचे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इंन्शलकर, रणाईचे येथील माजी मुख्याध्यापक विलास पाटील, माजी मुख्याध्यापक मोहन ताडे, रणाईचे येथील मुख्याध्यापक सी. के. पाटील, ग्रेडेड मुख्याध्यापक धीरज माळी (भोकरबारी), ग्रेडेड मुख्याध्यापक कैलास माळी (अंबापिंप्री), मुख्याध्यापक प्रभाकर विंचुरकर, जी. एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद कदम, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष अरविंद सोनटक्के, पर्यवेक्षक सुधाकर पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मगन चौधरी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोसावी सर, केंद्रप्रमुख भाऊसाहेब गोसावी, शिक्षक दत्तात्रय सोनवणे, लांबोळे गुरुजी, सिसोदे सर, ए. बी. धनगर सर, मनोहर पाटील, तुषार पाटील, चंद्रकांत पाटील, सुरेश महाजन, हरी महाजन, संभाजी पाटील, रामकृष्ण महाजन, अशोक पाटील, नरेंद्र पाटील (साने गुरुजी फाउंडेशन), डी. एम. पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष), रामकृष्ण पाटील (महाराष्ट्र राज्य अंगणवाडी आशा वर्कर संघटना), वाल्मीक मराठे (माजी जी. एस. संचालक, जळगाव), माणिकगीर गोसावी, कैलास माळी, प्रेमराज महाजन (प्रगतशील शेतकरी), प्रमोद चौधरी (अभियंता), वासुदेव चौधरी (सेवानिवृत्त शिक्षक), रावसाहेब चौधरी (एल. आय. सी. अभिकर्ता), गोटू चौधरी, ह. भ. प. चौधरी, प्रा. प्रवीण चौधरी, प्रा. ललित पाटील, देवेंद्र महाजन, ज्ञानेश्वर महाजन (संचालक, ज्ञानदीप क्लासेस), डॉ. कपिल महाजन (कळमसरे), पुरुषोत्तम महाराज, ह. भ. प. मुरलीधर चौधरी, विनायक पाटील, सुधीर चौधरी, महेंद्र शालिग्राम बोरसे (माजी तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अमळनेर), प्रकाश महाजन सर, जितेंद्र वाणी सर, सुनील वाघ (क्रीडा समन्वयक), महेमूद खान पठाण (सामाजिक कार्यकर्ते), रणजितसिंग पाटील (भाजप), देवेंद्रसिंग राजपूत, मनीषा राजपूत (शिक्षिका), डॉ. कुणाल पवार (जिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना), शरद पाटील (साहित्य परिषद), मनोहर नेरकर, गोकुळ बागुल (अहिराणी साहित्यिक), अशोक पाटील (आदर्श शिक्षक), मेहमूद पठाण, जयेश काटे (पत्रकार), उमेश काटे, उमेश ठाकूर, अजय भामरे, सोपान भामरे, भैय्यासाहेब मगर (संचालक, साई क्लासेस), तिलोत्तमा पाटील (महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस), कविता पवार (तालुकाप्रमुख), प्रा. मंदाकिनी भामरे (महिला अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस), अहिराणी कवी शरद धनगर,शिरूड माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.डी आहीरे , साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या मानद सचिव सविता बोरसे मँडम, शरदचंद्र पवार गटाच्या महिला तालुका अध्यक्ष योजना पाटील,ज्योती पाटील (योग शिक्षिका), डॉ. भारती पाटील (अध्यक्ष, आधार संस्था) व आधार संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनी, शोभा शिंदे (जिल्हाप्रमुख, नवनाथपंथी महिला समाज), ज्ञानेश्वर पाटील (सेक्रेटरी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, जळगाव जिल्हा), मनोज पाटील (नाशिक पूर्व प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस), भागवत सूर्यवंशी (तालुकाध्यक्ष, काँग्रेस), गजेंद्र साळुंखे, ॲड. पुष्पा सोनवणे, सुलोचना वाघ (महिला जिल्हाध्यक्ष, काँग्रेस), शीला पाटील (अध्यक्षा, मराठा समाज), ज्योतीताई पवार (विश्वस्त, संत गजानन सेवा संस्थान), दिनकरराव पवार (तालुका प्रतिनिधी, मराठी लाईव्ह न्यूज), अश्विन पाटील (पक्षिमित्र),
गोपाल महाजनसर, भीषण माळी जवखेडा ,महेश माळी, युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे,
मिलिंद संदानशिव (सेवानिवृत्त ग्रामसेवक)
साने गुरुजी कन्या विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक विलास चौधरी,करुणा कल्बचे गोकूळ बोरसे, बाळासाहेब पाटील, साहित्यिक भाऊसाहेब देशमुख, वावडे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.ई पाटील, साने गुरुजी वाचनालयाची चिटणीस प्रकाश वाघ,डि.ए.सोनवणे, ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप, बापू सांगोरे, साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या संचालक विजयसिंह पवार, खानदेश शिक्षण मंडळाच्या माजी उपाध्यक्ष माधुरी पाटील, काँग्रेसचे एडवोकेट पुष्पा सोनवणे, अर्बन बँक चे संचालक प्रवीण जैन,
![]()
आदी मान्यवर उपस्थित होते.
काही वाचक जाहिरातदार व मित्रपरिवार यांना कार्यक्रमाला येण्यासाठी समस्या निर्माण झाल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा संदेश दिले.
यासह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, साहित्यिक, पत्रकारिता, क्रीडा, सहकार आणि विविध संस्थांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
प्रतिक्रिया (0)