थेट बातम्यांकडे जा
रविवार, 29 नोव्हें 2026 20:35
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
2:34 PMसमतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल येथे २६ पुस्तकां… 11:29 AM२०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्देशीय संस्था व ज… 4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी…
महाराष्ट्र विशेष बातमी

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व , जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील सदस्यपदी बिनविरोध,कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व ,   जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील सदस्यपदी बिनविरोध,कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

अमळनेर प्रतिनिधी

-जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या टप्प्यावर राजकीय घडामोडींना वेग आला असताना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रफुल्ल पवार यांनी अमळनेर तालुका सोसायटी मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी सौ.जयश्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर विविध मतदारसंघांतील उमेदवारांच्या माघारीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यात अमळनेर सोसायटी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराची माघार महत्त्वपूर्ण ठरून परिणामी जयश्री पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.सदर बिनविरोध निवडीमुळे आमदार अनिल पाटील यांचे जळगाव जिल्हा बँकेतील वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे.

भाजप उमेदवाराचा अर्ज मागे होऊन जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित होताच.कार्यकर्त्यांनी अमळनेर येथे आनंदोत्सव साजरा केला.तर सर्व स्तरातून जयश्री पाटील यांच्यावर सत्काराचा वर्षाव झाला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर व ग्रामीण पदाधिकारी, मार्केट संचालक, शेतकी संघ संचालक,न प चे नगरसेवक,जि प,प स चे माजी पदाधिकारी,वि का सोसायटीचे असंख्य पदाधिकारी, ग्रा.प.चे पदाधिकारी युवक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयश्री पाटील यांची सहकार क्षेत्रात एन्ट्री

आमदार अनिल पाटील यांचा सुरवातीपासून सहकार क्षेत्रात प्रचंड दबदबा राहिला असून बाजार समिती व जिल्हा बँकेत अनेक वर्षे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.याशिवाय अमळनेर बाजार समिती व शेतकी संघ या दोन्ही संस्थावर आजही त्यांच्या नेतृत्वातील सत्ता आहे.जिल्हा बँकेत नव्या कायद्यामुळे आमदार अनिल पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेऊन आपल्या सौभाग्यवती सौ जयश्री पाटील यांना अमळनेर सोसायटी मतदारसंघात रिंगणात उतरवले होते.त्यांनी याआधी जिल्हा परिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष म्हणून दोन्ही सभागृहात प्रतिनिधित्व केले असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात एक अभ्यासू व कार्यक्षम महिला नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.यामुळे जिल्हा बँकेतील त्यांच्या उमेदवारीचे देखील अमळनेर तालुक्यातील मतदार व शेतकरी सभासदांनी स्वागत करून पसंती दर्शवली होती.त्यांच्या सुदैवाने शेवटच्या दोन दिवसात प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेऊन जयश्री पाटील यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केल्याने जयश्री पाटील यांच्या रूपाने सक्षम महिला नेतृत्वाची सहकार क्षेत्रात एन्ट्री झाली आहे.

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र समतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल ये… 6 तासांपूर्वी 1.1K महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे काल 202 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! काल 93 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! काल 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ काल 43 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… काल 50

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

महाराष्ट्र समतावादी साहित्य मंडळाचा 26 पुस्तकांचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी – नामदार छगन भुजबळ , एरंडोल ये… 6 तासांपूर्वी 1.1K खान्देश २०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प; जळगाव जिल्ह्यात जनजागृतीचा जागर , आधार बहुउद्दे… 9 तासांपूर्वी 72 खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… काल 90 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे काल 202 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… काल 43 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! काल 93 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! काल 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ काल 43 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… काल 50 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… काल 111 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… 2 दिवसांपूर्वी 39 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा 2 दिवसांपूर्वी 13