थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 19:30
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र विशेष बातमी

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षात एरंडोलमध्ये क्रांतिकारी सत्यशोधक विवाह संपन्न! प्रत्येकाने सत्यशोधक विचारांचा अंगीकार करून सत्यशोधक विधी करावेत – माजी आमदार महेंद्रसिंग पाटील.

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षात एरंडोलमध्ये क्रांतिकारी सत्यशोधक विवाह संपन्न!    प्रत्येकाने सत्यशोधक विचारांचा अंगीकार करून सत्यशोधक विधी करावेत – माजी आमदार महेंद्रसिंग पाटील.
थोडक्यातअंधश्रद्धा व कर्मकांडाला फाटा देत एरंडोलमध्ये सत्यशोधक विवाह संपन्न! महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त महाजन व सोनवणे परिवाराचा परिवर्तनवादी आदर्श एरंडोल येथे अश्विन आणि माधुरी यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने उत्साहात पार पडला. सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी महात्मा फुले यांच्या विचारांनुसार विवाहविधी संपन्न केला. पारंपरिक अक्षतांऐवजी वधू-वरांवर झेंडूच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. नवदांपत्याने अंधश्रद्धा व कर्मकांड न करण्याची तसेच महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचारांनुसार जीवन जगण्याची शपथ घेतली. यावेळी माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. नवदांपत्याला सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अंधश्रद्धामुक्त, विवेकवादी आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या दिशेने टाकलेले हे विवाह सोहळ्याचे पाऊल प्रेरणादायी ठरले.

धरणगाव प्रतिनिधी : (प्रमोद पाटील)

एरंडोल / धरणगांव - क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून एरंडोल येथे अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अनावश्यक रूढींना फाटा देत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला. महात्मा फुले स्मारकाजवळील माळीवाडा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सौ.पुष्पा व रितेश रामा माळी यांचे चिरंजीव तथा माजी नगरसेवक रुपेश रामा माळी व माजी उपनगराध्यक्ष सौ.सुनीता रुपेश माळी यांचे पुतणे सत्यशोधक अश्विन आणि तळई येथील आनंद धर्मराज चौधरी यांची सुकन्या सत्यशोधिका माधुरी यांचा विवाह रा.ती.काबरे विद्यालयाच्या मैदानावर सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांच्या हस्ते पार पडला. या विवाह सोहळ्याने महाजन व सोनवणे परिवाराने समाजासमोर परिवर्तनवादी विचारांचा आदर्श निर्माण केला. विवाह मंडपाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे फलक व प्रेरणादायी संदेश लावण्यात आले होते. नवदांपत्याने क्रांतीची मशाल हातात घेऊन विवाह मंडपात प्रवेश केला. प्रवेशद्वारावरील महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी कार्याची तसेच सत्यशोधक समाजाच्या विचारांची सविस्तर माहिती दिली. बहुजन समाजाने अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून सत्यशोधक विचारांचा अंगीकार करावा आणि विवाहासह सर्व सामाजिक विधी सत्यशोधक पद्धतीने करावेत, असे आवाहन केले. महाजन व सोनवणे परिवाराने उचललेले हे पाऊल खऱ्या अर्थाने क्रांतिकारी असून इतरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांनी या सत्यशोधक विवाहाचे विशेष कौतुक केले. प्रत्येकाने सत्यशोधक विचारांवर चालून सत्यशोधक पद्धतीने विवाह करावेत. तालुक्यातील गावागावांत असे विवाह सोहळे संपन्न होणे हीच महामानवांना खरी आदरांजली ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.विवाह सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विवाह मंडपातील विचारपीठावर वधू-वरांच्या माता-पिता तसेच मामा-मामी यांना सन्मानपूर्वक स्थान देण्यात आले.सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी.डी.पाटील यांनी महात्मा फुले रचित अखंड 'सत्य सर्वांचे आदि घर, सर्व धर्मांचे माहेर' या रचनेने सोहळ्याची सुरुवात केली. त्यानंतर सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी महात्मा फुले यांनी रचलेल्या मराठी मंगलाष्टकांचे गायन केले. पारंपरिक अक्षतांऐवजी नवदांपत्यावर झेंडूच्या फुलांची पाकळ्यांची उधळण करण्यात आली.या सोहळ्यात नवदांपत्याने सर्व उपस्थितांच्या साक्षीने अंधश्रद्धा व कर्मकांड यांचे आचरण करणार नाही तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनुसार जीवन जगू, अशी सामूहिक शपथ घेतली. माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार,ज्ञानेश्वर महाजन व पी डी पाटील यांच्या हस्ते नवदांपत्याला सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या विवाह सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, माजी सभापती शालिकभाऊ गायकवाड, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, पोलीस निरीक्षक सुनील पवार, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगराध्यक्ष समाजभूषण देविदास महाजन, माजी चेअरमन दुर्गादास महाजन, संजय महाजन, आरटीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आबासाहेब वाघ, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी.डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद महाजन, तालुकाध्यक्ष हिलाल फुलारी, जिल्हा सचिव कविराज पाटील, पत्रकार प्रवीण महाजन, दिनेश महाजन यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, साहित्य व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी बोरसे व सोनवणे परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल महाजन यांनी केले, तर नगरसेवक अनिल महाजन यांनी आभार मानले. महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षात पार पडलेला हा सत्यशोधक विवाह केवळ दोन जीवांचे मिलन नसून अंधश्रद्धामुक्त, विवेकवादी आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या दिशेने टाकलेले एक प्रेरणादायी पाऊल ठरले.

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 7 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 11 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 3 तासांपूर्वी 11 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 7 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 7 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 9 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 11 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 19