थेट बातम्यांकडे जा
शनिवार, 28 नोव्हें 2026 19:36
बातमी पाठवा
ताज्या घडामोडी
4:28 PMक्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीनिमित्त संस्थेच… 1:51 PMहिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 12:27 PMअंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि… 11:50 AMसहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 11:34 AMमहात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 9:36 AMसरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 8:21 AMसंत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न 7:04 AMमहात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या विद्यार्थ्यांनी… 1:25 PMअंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीचा निधी बागेश्व… 10:55 AMस्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र विशेष बातमी

बालविवाहमुक्त समाजाचा संकल्प; जनजागृती मोहिमेतून बालहक्कांचा जागर! , आधार बहुउद्देशीय संस्था व महिला-बालविकास विभागाचा पुढाकार; महिला, आशा व अंगणवाडी सेविकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

बालविवाहमुक्त समाजाचा संकल्प; जनजागृती मोहिमेतून बालहक्कांचा जागर!  , आधार बहुउद्देशीय संस्था व महिला-बालविकास विभागाचा पुढाकार; महिला, आशा व अंगणवाडी सेविकांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
थोडक्यातऔरंगपूर येथे बालविवाह प्रतिबंधक जनजागृती मोहीम आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर व जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने औरंगपूर येथे बालविवाह प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी महिला, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचतगटातील महिला व बालकांनी सहभाग घेतला. दिवे प्रज्वलित करून बालविवाहमुक्त समाजाचा संकल्प करण्यात आला. बालविवाहाचे दुष्परिणाम, बालहक्क, शिक्षण, आरोग्य आणि कायदेशीर तरतुदींविषयी मार्गदर्शन करून बालविवाह रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला भारती पाटील, रेणु प्रसाद, आनंद पगारे, मोहिनी धनगर व मुरलीधर बिरारी उपस्थित होते.

अमळनेर प्रतिनिधी : बालविवाह ही बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी गंभीर सामाजिक समस्या असून, बालविवाहाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. याच उद्देशाने अमळनेर तालुक्यातील औरंगपूर येथे आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर व जिल्हा महिला बालविकास यांच्या वतीने बालविवाह प्रतिबंधक जनजागृती विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत गावातील महिला, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, बचतगटातील महिला तसेच लहान बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी दिवे प्रज्वलित करून बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. महिलांशी व बालकांशी संवाद साधून बालविवाहाचे दुष्परिणाम, बालकांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, बालहक्क तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

बालविवाहामुळे मुला-मुलींच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात. त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी पालक, महिला, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, आशा सेविका आणि संपूर्ण ग्रामसमुदायाने सतर्क राहून जबाबदारीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

नोव्हेंबर महिन्यात बालहक्क सप्ताह आणि बालविवाह प्रतिबंधक जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने विविध स्तरांवर जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षण, आरोग्य, पोलीस, ग्रामपंचायत, महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून बालविवाहमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

या कार्यक्रमाला आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष भारती पाटील, संचालक रेणु प्रसाद, प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, तालुका समन्वयक मोहिनी धनगर आणि मुरलीधर बिरारी उपस्थित होते.

बालविवाह रोखणे ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक मुला-मुलीला शिक्षण, सुरक्षित बालपण आणि उज्ज्वल भविष्य मिळावे, यासाठी बालविवाहमुक्त गाव आणि बालविवाहमुक्त भारत घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

शेअर करा

महाराष्ट्र : आणखी बातम्या

सर्व पहा
महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 8 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 10 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 11 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90

प्रतिक्रिया (0)

ताज्या बातम्या

खान्देश क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना श्री क्षत्रिय माळी समाज संस्थेतर्फे अभिवादन पुण्यतिथीन… 3 तासांपूर्वी 11 महाराष्ट्र हिंदू संघटनांच्या आंदोलनाला यश; विशेष सभेतील ठरावानंतर पालिकेची धडक कारवाई, उपोषण मागे 5 तासांपूर्वी 122 खान्देश अंतुर्ली कार्तिक स्वामी यात्रेत सुमारे दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन! , उत्तम नियोजन, शिस्तबद्ध… 7 तासांपूर्वी 12 महाराष्ट्र सहकार क्षेत्रात जयश्री पाटील यांचा नवा मानाचा अध्याय; शेतकी संघातर्फे जंगी नागरी सत्कार! 7 तासांपूर्वी 35 महाराष्ट्र महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर; एरंडोलमध्ये कवितांतून सामाजिक परिवर्तनाचा हुंकार! 8 तासांपूर्वी 1K महाराष्ट्र सरस्वती विद्यामंदिरात जिल्हास्तरीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ 10 तासांपूर्वी 28 महाराष्ट्र संत श्री खुशालदास महाराजांच्या जयघोषाने अमळनेर दुमदुमले; भावसार समाजाचा पालखी सोहळा उत्साहात सं… 11 तासांपूर्वी 44 महाराष्ट्र महात्मा फुलेंचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन; देवगाव येथे अनोखा उपक्रम उत्साहात! , दहावीच्या वि… 12 तासांपूर्वी 90 महाराष्ट्र अंधेरीत भक्ती, राष्ट्रभक्ती आणि त्यागाचा अनोखा संगम; २६/११ च्या शहीदांच्या कुटुंबीयांकडून मदतीच… काल 38 महाराष्ट्र स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा काल 10 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एल्गार! वर्षभरानंतरही आदेशाची अंमलबजावणी नाही -अँड कौस्तुभ पाटील काल 25 महाराष्ट्र बालविवाह निर्मूलनाचा संदेश विद्यार्थ्यांच्या साखळीतून; ए. टी. झांबरे विद्यालयात जनजागृती उपक्रम… काल 19