![]()
धरणगाव प्रतिनिधी : (पी डी पाटील)
धरणगाव : सत्यशोधक भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठान ओतूर आयोजित महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक शाळेच्या वारसा लाभलेल्या पवित्र ओतूरनगरीत महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन दि.२१ नोव्हेंबर २०२६ शनिवार रोजी सत्यशोधक अधिवेशनात शास्त्री नारो बाबाजी महाधट पाटील लिखित दुर्मिळ ग्रंथ "महात्मा फुले यांचे अमर जीवन " व पी डी पाटील लिखित "आदर्श महामाता" या पुस्तकांच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन थाटामाटात संपन्न झाले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा ओबीसी नेते नामदार छगनरावजी भुजबळ होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, संसदरत्न डॉ.अमोलजी कोल्हे, शिक्षक आमदार सुधीर तांबे, आमदार शरददादा सोनवणे, माजी आमदार दिलीपराव ढमढेरे, उत्तमराव पाटील, अक्षयदादा सोनवणे, संजयराव काळे, उल्हास पवार, शमसोद्दीन तांबोळी, बापूसाहेब भुजबळ, सुरेशजी तारे, डॉ.किरण गजमल, नितीनकुमार एकबोटे, अमोलजी बेंद्रे, शरदराव काळे, सागर माळी, अतुलजी काळे, सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, उपाध्यक्ष दत्ताजीराव जाधव, विश्वस्त डॉ. डी बी शेंडे, प्रा. डॉ.उमेश बगाडे, किशोर नरक, प्रा.शरद बाविस्कर, प्रा.सुधाकर शेलार उपस्थित होते.
मान्यवरांनी वरील दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन करीत पुस्तकांचे कौतुक केले.व लेखक पी डी पाटील यांना पुढील लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळ सराफ तर आभार शिवाजीराव तांबे यांनी मानले.
पी डी पाटील लिखित आदर्श महामाता पुस्तकाचे प्रकाशन
▪️प्रथम आवृत्ती : १० मार्च, २०२४
सत्यशोधक समाजाचे पहिले महिला राज्य अधिवेशन नायगाव ता. खंडाळा,जि. सातारा.
▪️दुसरी आवृत्ती : ३० नोव्हेंबर ,२०२४
सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्य अधिवेशन ता. जि.अहिल्यानगर.
▪️तिसरी आवृत्ती :२१ नोव्हेंबर,२०२६
महाराष्ट्र राज्यव्यापी विशेष सत्यशोधक अधिवेशन - २०२६ ओतूर ता. जुन्नर जि.पुणे.
![]()
प्रतिक्रिया (0)