नंदुरबारमध्ये रूपाबाई वाघ यांचे निधन; शनिवारी अंत्ययात्रा
![]()
नंदुरबारमध्ये रूपाबाई वाघ यांचे निधन; शनिवारी अंत्ययात्रा
नंदुरबार (प्रतिनिधी) – येथील जयनगर परिसरातील रहिवासी कै. रूपाबाई नारायण वाघ यांचे शुक्रवार दि. 1 मे 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कै. वाघ या शांत, साध्या व कुटुंबवत्सल स्वभावामुळे परिचित होत्या. त्यांच्या पश्चात मुलगे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा शनिवार दि. 2 मे रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांच्या राहत्या घरून, बासुरी नगर, प्लॉट क्र. 8, हॉटेल बाबा रिसॉर्ट समोर, नंदुरबार येथून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात श्री. सुभाष नारायण वाघ, श्री. काशिनाथ नारायण वाघ (उपशिक्षक, कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल; राष्ट्रीय सचिव – अखिल भारतीय माळी महासंघ; उपजिल्हाध्यक्ष – भाजपा शिक्षक आघाडी धुळे; सहसचिव – विज्ञान व गणित अध्यापक मंडळ धुळे) तसेच श्री. संजय नारायण वाघ (गुरु माऊली आडत दुकान, नंदुरबार) असा परिवार आहे.

