ब्राम्हणवेल विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त देशभक्तीचा जागर आणि संस्कारोत्सव !*
![]()
*ब्राम्हणवेल विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त देशभक्तीचा जागर आणि संस्कारोत्सव !*
नंदुरबार प्रतिनिधी
*कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल येथे दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यसूर्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी, संस्कारमय आणि देशभक्तीने ओतप्रोत भरलेला कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.*
*कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कु. हेमलता जव्हेरी, कु. राशी गावित, कु. लक्ष्मी ठाकरे, कु. कामिनी बहिरम व कु. भाग्यश्री कोरे यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाला मंगलमय सुरुवात झाली.*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन उपस्थित होते.*
*मुख्याध्यापक मा. काशिनाथ माळी यांनी शालेय प्रस्तावनेत लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या राष्ट्रप्रेम, सामाजिक समता व शिक्षणविषयक विचारांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन केले.*
*विद्यार्थ्यांनी प्रभावी मनोगते, देशभक्तीपर गीत, समूह नृत्य आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांतून राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला उत्स्फूर्त दाद दिली.*
*कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे यांनी फलक लेखन, गीत गायन, देशभक्तीपर समूह नृत्याचे दिग्दर्शन, मौलिक देशभक्तीपर विचार, पोवाडा गायन तसेच प्रभावी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली.*
*क्रीडा शिक्षक श्री निकुंभ बी. एस यांनी शिस्त बद्ध नियोजन ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित कलात्मक विचार, देशभक्तीपर प्रेरणादायी शायरी केली. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून रोख बक्षीसे दिली. चॉकलेट देऊन तोंड गोड करण्यात आले. देशभक्ती, सामाजिक समता, संस्कार आणि कलागुणांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलीत करणारा ठरला.*
शब्दांकन 👏🌹
✒️ हिरामण सोनवणे (कलाशिक्षक)


अतिशय सुंदर बातमी धन्यवाद!
🌹🌹🌹🌹🌹 अतिशय सुंदर बातमी!