अमळनेर संघाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल
1 min read

अमळनेर संघाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल

Loading

 

अमळनेर संघाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल

अमळनेर प्रतिनिधी
: अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ ली. या तालुक्यातील प्रतिष्ठित संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
संघाच्या व्यक्तिशः मतदारसंघातून मांडळ गावाचे माजी सरपंच केशवराव पोपट पाटील (जितु बापू) यांनी सहायक निबंधक कार्यालयात आपले नामनिर्देशन पत्र सादर केले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख व नगरसेवक गुलाब पाटील, बाजार समिती संचालक विजय पाटील, युवासेना तालुकाप्रमुख राहुल कंजर, शहरप्रमुख प्रविण पाटील, सचिन चौधरी, भुषण कोळी, शंतनु भावसार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गुलाब पाटील यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करून माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे करण्यात येणार आहे. तसेच ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्यास शिवसेना सज्ज असून, वरिष्ठ पातळीवर काही निर्णय झाल्यास त्यानुसार पुढील रणनीती ठरविण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *