नूतन विद्यालयात दप्तर व डेस्कचे वाटप.  सी एस आर उपक्रमातून शिक्षणाला बळ.
1 min read

नूतन विद्यालयात दप्तर व डेस्कचे वाटप. सी एस आर उपक्रमातून शिक्षणाला बळ.

Loading

नूतन विद्यालयात दप्तर व डेस्कचे वाटप.

सी एस आर उपक्रमातून शिक्षणाला बळ.

दोंडाईचा प्रतिनिधी:
शिंदखेडा तालुक्यातील धमाणे येथील नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून प्राप्त झालेल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमाअंतर्गत हिंदुस्थान पेट्रोलियम आणि युनिसेड यांच्या संयुक्त विद्यमाने होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व डेस्कचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर. डी. पाटील होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका सुनीता पाटील, स्वोधारक विद्यार्थी संस्थेचे संस्थेचे सचिव तथा धुळे जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ललित गिरासे, कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे संचालक व माजी पंचायत समिती सभापती जिजाबराव पाटील, गटशिक्षणाधिकारी डी. एस. सोनवणे, धमाणे गावाच्या सरपंच साखरताई सोनवणे, उपसरपंच नथेसिंग गिरासे, ग्रामपंचायत सदस्य भगवंतराव पाटील, सुजित पाटील, पोलीस पाटील निलेश पाटील, पंचायत समिती सदस्य दुल्लभ सोनवणे, कुरुकवाडे गावाच्या सरपंच वर्षा पाटील, पोलीस पाटील प्रकाश पाटील तसेच केंद्रप्रमुख राजेंद्र नांदोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सीएसआर उपक्रमातून शिक्षणाला मिळाले बळ

पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम आणि युनिसेड यांनी सहकार्य केले. या माध्यमातून ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व्ही. जी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *