अहिरराव परिवारावर शोककळा, श्रीमती शकुंतला बाबुराव पाटील यांचे निधन; उद्या अमळनेर येथे अंत्यसंस्कार
![]()
अहिरराव परिवारावर शोककळा
श्रीमती शकुंतला बाबुराव पाटील यांचे निधन; उद्या अमळनेर येथे अंत्यसंस्कार
अमळनेर, प्रतिनिधी :
अहिरराव परिवारातील ज्येष्ठ सदस्य गं.भा. श्रीमती शकुंतला बाबुराव पाटील यांचे शनिवार, दि. 13 जून 2026 रोजी पहाटे 4 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर रविवार, दि. 14 जून 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता अमळनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुमार्ग परंपरेनुसार मयत पूजा दि. 21 जून 2026 रोजी अमळनेर येथील राहत्या घरी होणार असून, दशक्रिया विधी दि. 22 जून 2026 रोजी राहत्या घरी संपन्न होणार आहे.
या धार्मिक विधींसाठी श्री मध्वमुनी महाराज दत्त संस्थान, शिरुड येथील परमपूज्य त्रेतापुरी गुरु विजयपुरी महाराज आचार्य म्हणून उपस्थित राहणार आहेत.
त्यांच्या पश्चात परिवार, नातेवाईक व आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.
शोकाकुल :
श्री. गुलाब बळीराम पाटील,
श्री. दिलीप बळीराम पाटील,
समस्त अहिरराव परिवार, शिरुड
ता. अमळनेर, जि. जळगाव.
🕯️ ईश्वर आत्याम्यास
देवो व परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच श्रद्धांजली.
💐💐💐

