पालघर जिल्ह्याचा शैक्षणिक गौरव : चेतन ठाकरे यांना ‘सर्वोत्तम शिक्षक रत्न पुरस्कार’
![]()
*चेतन ठाकरे ” सर्वोत्तम शिक्षक रत्न पुरस्काराने ” सन्मानित
युनिव्हर्सल युनिटी फाउंडेशन या नामांकित संस्थेमार्फत सर्वोत्तम व्यक्तिमत्व पुरस्कार सन्मान सोहळा – 2026 मराठी ग्रंथ संग्रहालय,ठाणे येथे नुकताच अतिशय आनंदामध्ये पार पडला.अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण,ता. विक्रमगड,जि.पालघर येथील माध्यमिक शिक्षक व मोहो खुर्द गावचे रत्न श्री.चेतन रमेश ठाकरे सरांना यावर्षीचा “सर्वोत्तम शिक्षक रत्न पुरस्कार” प्रमुख पाहुणे अभिनेते मा. दिलीप केदार यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार स्विकारताना समृद्धी प्रकाशनचे अध्यक्ष श्री.बि.एन.खरात साहेब,श्री.रविंद्र वेखंडे व कुटुंबीय तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.चेतन सरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी अनुभवायला नेहमीच मिळते.ते विद्यार्थीभिमुक शिक्षक असून विद्यार्थीप्रिय,समाजप्रिय शिक्षक असून अनेक आदर्श विध्यार्थी त्यांनी घडविले आहेत.सरांनी शैक्षणिक,सामाजिक,क्रीडा, कृषी, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी नेहमी कौतुकास्पद व उल्लेखनीय राहिली आहे.आतापर्यंत त्यांना 12 राज्यस्तरीय, 05 राष्ट्रीय व 02 आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.प्रकल्प कार्यालय जव्हार, संस्थेचे पदाधिकारी,आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री.रमेश माळी सर, शिक्षक वृंद,कर्मचारी,विध्यार्थी, नातेवाईक तसेच सर्वच क्षेत्रातुन सरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

