पोटाची आग विझवण्यासाठी, जीव उंच खांबावर झुलतो; विकासाच्या गप्पांमध्ये मात्र, गरीब अजूनही भुकेशी लढतो…”
![]()
पोटाची आग विझवण्यासाठी, जीव उंच खांबावर झुलतो;
विकासाच्या गप्पांमध्ये मात्र, गरीब अजूनही भुकेशी लढतो…”
अमळनेर प्रतिनिधी
आजही देशातील अनेक कुटुंबांची परिस्थिती अशी आहे की, दोन वेळच्या भाकरीसाठी जीव धोक्यात घालून कसरती कराव्या लागतात. छायाचित्रातील हे दृश्य केवळ एक खेळ किंवा करमणूक नसून गरिबी, असुरक्षितता आणि उपेक्षित जीवनाचे जिवंत चित्र आहे.
एका लहानग्या बालिकेला उंच खांबावर तोल सांभाळून उभे राहावे लागत आहे, तर खाली तिचे कुटुंब लोकांचे मनोरंजन करून उदरनिर्वाहाचा प्रयत्न करत आहे. या कसरतीत धोका मोठा आहे, मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे वास्तव दिसून येते.
देश विकासाच्या गप्पा मारत असतांना, आधुनिक भारताचे चित्र रंगवले जात असताना, अशा कुटुंबांचे प्रश्न मात्र आजही कायम आहेत. बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक विषमता यामुळे अनेकांना आपल्या मुलांनाही अशा धोकादायक कामांमध्ये सहभागी करावे लागते.
प्रश्न असा आहे की, जर आजही लहान मुलांना पोटासाठी जीव धोक्यात घालावा लागत असेल, तर यालाच “अच्छे दिन” म्हणायचे का?
समाज आणि शासनाने अशा कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षित रोजगाराच्या संधींसाठी अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज आहे. कारण खरा विकास तोच, जो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल.

