अमळनेरमध्ये शोककळा : पंडित बाबूलाल भोई यांचे दुःखद निधन  , सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने यांचे वडील; अल्पशा आजाराने निधन, अमलेश्वर नगर येथून सकाळी आज १० वाजता निघणार अंत्ययात्रा
1 min read

अमळनेरमध्ये शोककळा : पंडित बाबूलाल भोई यांचे दुःखद निधन , सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने यांचे वडील; अल्पशा आजाराने निधन, अमलेश्वर नगर येथून सकाळी आज १० वाजता निघणार अंत्ययात्रा

Loading

अमळनेरमध्ये शोककळा : पंडित बाबूलाल भोई यांचे दुःखद निधन

सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने यांचे वडील; अल्पशा आजाराने निधन, अमलेश्वर नगर येथून सकाळी आज १० वाजता निघणार अंत्ययात्रा

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर : शहरातील अमलेश्वर नगर परिसरात शोककळा पसरली असून, सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोज पंडित शिंगाने यांचे वडील श्री. पंडित बाबूलाल भोई यांचे अल्पशा आजाराने शनिवार, दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०.०० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिंगाने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक व परिसरातील नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्व. बाबूलाल भोई हे शांत, संयमी व कष्टाळू स्वभावाचे होते. त्यांच्या साध्या आणि प्रेमळ वागणुकीमुळे त्यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने एक जिव्हाळ्याचा, माणुसकी जपणारा व्यक्ती हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

त्यांची अंत्ययात्रा रविवार, दि. ०३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता राहत्या घरापासून, अमलेश्वर नगर येथून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात पुत्र अमळनेर येथील रक्तदान चळवळीचे उद्गाते,युवा सामाजिक कार्यकर्ते
श्री. मनोज पंडित शिंगाने, श्री. नितीन पंडित शिंगाने, श्री. सुनील पंडित शिंगाने, तसेच कुटुंबीय असा मोठा परिवार आहे.
समस्त शिंगाने परिवारावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगी परिसरातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

 

 

आमचे मित्र व युवा सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगणे यांचे वडील पंडित बाबूलाल भोई यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व शोकाकुल परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐

— मराठी लाईव्ह न्यूज, संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *