रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि खेड तालुक्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनल चे वाटप आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून वाटप*
![]()
*रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली आणि खेड तालुक्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनल चे वाटप आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून वाटप*
*कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2025-26 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना सोलर पॅनल चे वाटप कार्यक्रम आज दिनांक 01 मे 2026 रोजी कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमान चंदुलाल शेठ विद्यालय खेड येथे वाटप केले. शाळांना मिळणारे वेतने तर अनुदान हे अत्यंत तुटकुंज आहे, अनेक शाळांना लाईट बिल भरण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, दुर्गम डोंगराळ भागामध्ये लाईट सुद्धा खंडित होत असते, या सर्वांचा विचार करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा हा प्रयत्न आहे, यातून शाळांना प्रेरणा आणि विद्यार्थी शालेय गुणवत्ता वाढवण्यासाठी सोलर सिस्टिम चा उपयोग होणार आहे. खेडमधील 20, मंडणगड मधील 10, व दापोली मधील 15 शाळाना सुमारे एक कोटी दहा लाखाचे सोलर सिस्टिम साहित्य वाटप करण्यात आले, सदर साहित्य फिटिंग करण्यासाठी पॅनल बॅटरी यूपीएस आणि वायरिंग फिटिंग साठी लवकरच लोक साहित्य घेऊन शाळेमध्ये येतील, सोलर पॅनल सिस्टीम बसवल्यानंतर, त्याची निगा आणि देखरेख विषय सुद्धा माहिती देण्यात आली, साहित्य फिटिंग झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्या हस्ते उद्घाटन करावे अशी सूचना दिली, उर्वरित शाळांना दुसऱ्या टप्प्यात सोलर पॅनल देण्यात येतील, आज पर्यंत कोकण विभागात कोणकोणती काम केली त्याबद्दल माहिती दिली तसेच अनुदान, पेन्शन, अर्धवेळ शिक्षक, विध्यार्थी निकष, शाळा तेथे मुख्याध्यापक, TET, अशैक्षणिक कामे, वेतनेतर अनुदान व अन्य शैक्षणिक विषयांवर, करत असलेली पाठपुराव्या बद्दल आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनीमार्गदर्शन केले.*
*या प्रसंगी प्रमुख मान्यवर भाजपा नेते श्री. वैभव खेडेकर साहेब यांनी आज पर्यंतच्या शिक्षक आमदार मध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी अत्यंत चांगलं काम केलं आहे, पहिल्यांदाच एवढा फंड शाळांसाठी देणार आणि शिक्षक शिक्षकेतर आणि शाळांसाठी तळमळीने काम करणारा आमदार मी पहिल्यांदाच पाहत आहे, संस्थेचे चेअरमन राजेश भाई बुटाला, संचालक संजय बुटाला, मंडळ अध्यक्ष ऋषिकेश मोरे, दापोलीचे संचालक इक्बाल भाई परकार, रत्नागिरी जिल्ह्या मुख्याध्यापक अध्यक्ष आयूब मुल्ला, नगरसेविका वैभवी खेडेकर, संभाजी देवकाते, लतेश मामा नांदगावकर, नंदू साळवी, जया साळवी, नगरसेवक रहीम साईबोले, संदेश राऊत सर, विजय गुप्ता, उत्तम कांबळे, पाटील बी आर, प्रशांत खेडकर, मिश्रा सर, अरुण काटे, सुमित जाधव, कदम मॅडम, भुवड मॅडम, खेडेकर मॅडम, चव्हाण सर, धोत्रे सर, संतोष हजारे सर, घाणेकर सर, सूरज चाळके आणि शाळांचे लाभार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.*

