शिवसेना शिक्षक सेनेत राजेंद्र पाटील यांना मोठी जबाबदारी; अमळनेर तालुकाप्रमुखपदी नियुक्ती
![]()
शिवसेना शिक्षक सेनेत राजेंद्र पाटील यांना मोठी जबाबदारी; अमळनेर तालुकाप्रमुखपदी नियुक्ती
अमळनेर प्रतिनिधी
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संघटनात्मक कार्याला अधिक गती देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेना (जळगाव जिल्हा) अंतर्गत राजेंद्र श्रीराम पाटील यांची अमळनेर तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त अधिकारांचा वापर करून ही नियुक्ती करण्यात आली. संघटना अधिक मजबूत करणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे काम करावे, अशा शुभेच्छाही नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्हाध्यक्ष (माध्यमिक) रवींद्र बाबुराव चव्हाण तसेच जिल्हा सरचिटणीस (माध्यमिक) महेंद्र दत्तात्रय पवार यांच्या हस्ते राजेंद्र पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
राजेंद्र पाटील हे स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालय, मंगरूळ येथे कार्यरत असून, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. ते हिंदी अध्यापक मंडळाचे अमळनेर तालुकाध्यक्ष तसेच साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे विद्यमान संचालक म्हणूनही कार्यरत आहेत.
त्यांच्या या नियुक्तीचे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे प्रकाश पाटील, साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे, साने गुरुजी शिक्षक पतपेढीच्या संचालिका प्रतिभा जाधव मॅडम, संचालक सचिन साळुंखे, भाऊसाहेब पाटील
हिंदी अध्यापक मंडळाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य एन. आर. चौधरी, सचिव दिलीप पाटील,उपाध्यक्ष योगश्री पाटील मँडम,
माजी अध्यक्ष दीपक पवार, आशिष शिंदे तसेच हिंदी अध्यापक मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, मित्रपरिवार आणि विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राजेंद्र पाटील यांच्या नियुक्तीमुळे अमळनेर तालुक्यात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

