ज्ञानसाधनेला सुवर्णमुकुट!  ,प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी.; समाजकार्य क्षेत्रात मानाचा बहुमान
1 min read

ज्ञानसाधनेला सुवर्णमुकुट! ,प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी.; समाजकार्य क्षेत्रात मानाचा बहुमान

Loading

ज्ञानसाधनेला सुवर्णमुकुट!

प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी.; समाजकार्य क्षेत्रात मानाचा बहुमान

अमळनेर प्रतिनिधी

समाजकार्य क्षेत्रातील अभ्यासपूर्ण संशोधन आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक योगदानाची दखल घेत समाज कार्य महाविद्यालय, अमळनेर येथील प्रा. विजयकुमार भास्करराव वाघमारे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे समाजकार्य विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांना Ph.D. Notification प्रदान करून गौरविण्यात आले.
प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांनी समाजकार्य विषयातील संशोधन यशस्वीपणे पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. त्यांच्या या यशामुळे समाजकार्य क्षेत्रासह अमळनेरच्या शैक्षणिक विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रसंगी त्यांचे संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. सुदाम राठोड, सहयोगी प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे (जि. धुळे), तसेच विद्यापीठाचे उपकुलसचिव (परीक्षा विभाग) श्री. वसंत वळवी, प्रा. धनराज ढगे, दीपक संदानशिव आणि मुरलीधर बिरारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, विश्वस्त रेणू प्रसाद तसेच आधार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक व संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रखर जनसंवाद परिवारातर्फे प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांचे पीएच.डी. प्राप्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व भावी शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *