जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर च्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर संपन्न*
![]()
*जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर च्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर संपन्न*
श्री संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त दर वर्षी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते . त्यात जीवन श्री रक्तसंकलन पेढीच्या माध्यमातून जायन्ट्स ग्रुप च्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रोग शिबिरात शहरातील सर्व नामांकित डॉक्टर्स नी आपल्या सेवेचे मोफत योगदान दिले . शहरातील व परिसरातील शेकडो लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला त्यात 500 रुग्णाना मोफत औषधोपचार देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून जायन्ट्स ग्रुप च्या माध्यमातून सुमारे 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या प्रसंगी जायन्ट्स ग्रुप चे जेष्ठ मार्गदर्शक प्रा पी आर भावसार, प्रा चंदूलाल बडगुजर, युनिट ऑफिसर डॉ सुनील पाटील, अध्यक्ष डॉ महेश पाटील, सेक्रेटरी संदिप महाजन, महेश पाटील,प्रशांत पाटील, संतोष वाघ आदी उपस्थित होते.

