संस्कारांचा वारसा जपणारे कै. भिका पाटील काळाच्या पडद्याआड  , अंत्ययात्रा आज दुपारी दोन वाजता मालखेडा येथून..
1 min read

संस्कारांचा वारसा जपणारे कै. भिका पाटील काळाच्या पडद्याआड , अंत्ययात्रा आज दुपारी दोन वाजता मालखेडा येथून..

Loading

संस्कारांचा वारसा जपणारे कै. भिका पाटील काळाच्या पडद्याआड

अंत्ययात्रा आज दुपारी दोन वाजता मालखेडा येथून..

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल व ज्युनियर कॉलेजचे उपशिक्षक श्री. शरद भिका पाटील व श्री. प्रदीप भिका पाटील यांचे वडील कै. भिका कृष्णा पाटील (वय 75) यांचे गुरुवार, दि. 19 मार्च 2026 रोजी रात्री 10.40 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
कै. भिका कृष्णा पाटील (बापू) यांनी आपल्या आयुष्यात कुटुंबातील मुलांना उत्तम संस्कार देत सुसंस्कृत केले. त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात दोन्ही मुलांनी, सुनांनी व नातवंडांनी त्यांची मनापासून सेवा व काळजी घेतली.
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दि. 20 मार्च 2026 रोजी दुपारी ठीक 2.00 वाजता राहत्या घरी, मालखेडा, ता. चोपडा येथून निघणार आहे.
या दुःखद प्रसंगी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व सहकारी यांनी शोक व्यक्त केला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. भिका कृष्णा पाटील (बापू) यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
शोकाकुल
श्री. प्रदीप भिका पाटील
श्री. शरद भिका पाटील
बाविस्कर परिवार, मालखेडा (ता. चोपडा)

मराठी लाईव्ह न्यूजच्या वतीने कै. बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली…
– ईश्वर आर. महाजन, पत्रकार, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *