ज्येष्ठ समाजसेवक महारुसिंग राजपूत यांचे निधन; कळमसरे परिसरावर शोककळा , मीराबाई जयंती परंपरेचे प्रवर्तक, मितभाषी व भक्तिमय व्यक्तिमत्त्व हरपले , त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार दि. 20 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता कळमसरे येथून निघणार
![]()
ज्येष्ठ समाजसेवक महारुसिंग राजपूत यांचे निधन; कळमसरे परिसरावर शोककळा
मीराबाई जयंती परंपरेचे प्रवर्तक, मितभाषी व भक्तिमय व्यक्तिमत्त्व हरपले
त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार दि. 20 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता कळमसरे येथून निघणार
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावचे ज्येष्ठ नागरिक व समाजसेवक कै. महारुसिंग हुलेसिंग राजपूत यांचे शुक्रवार दि. 20 मार्च 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कळमसरे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एक श्रद्धावान, मितभाषी आणि समाजनिष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
कै. राजपूत हे धार्मिक वृत्तीचे असून त्यांनी आयुष्यभर भक्ती व समाजकार्य यांना प्राधान्य दिले. विशेषतः मीराबाई जयंती उत्सवाचे आयोजन महाराष्ट्रभर करण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता. या माध्यमातून त्यांनी समाजात एकात्मता, संस्कार आणि धार्मिक जागर वाढविण्यास हातभार लावला.
कळमसरे परिसरातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. लग्न समारंभात फेटा बांधण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. अत्यंत शांत, मितभाषी आणि साध्या जीवनशैलीमुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले.
त्यांच्या पश्चात श्री. विजयसिंह महारुसिंग राजपूत, श्री. सतीश महारुसिंग राजपूत,
तसेच श्री. जितेंद्र प्रल्हादसिंह राजपूत व श्री. लोटनसिंग देवीसिंग राजपूत, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार दि. 20 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता कळमसरे येथून निघणार आहे.
कै. महारुसिंग राजपूत यांनी आपल्या कुटुंबाला उत्तम संस्कार दिले असून त्यांचा परिवारही धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय आहे.
मराठी लाईव्ह न्यूजच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, शोकाकुल परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे.

