ओबीसी महामंडळाला कॅबिनेट दर्जा देण्याची मागणी; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन
1 min read

ओबीसी महामंडळाला कॅबिनेट दर्जा देण्याची मागणी; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन

Loading

ओबीसी महामंडळाला कॅबिनेट दर्जा देण्याची मागणी; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाची बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ओबीसींसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करून त्याला कॅबिनेट दर्जा देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांना निवेदन देऊन त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे अधिकार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष दिनेश शेलकर तसेच वाशिम येथील गुलाटे साहेब यांना दिले.

यानुसार उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्याशी ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक विचार व्हावा, यासाठी पुढील काळातही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दिनेश शेलकर
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल उपाध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *