तरुणाईवर शोककळा… कै. चेतन साहेबराव माळी यांचे आकस्मिक निधन , त्यांची अंत्ययात्रा आज सोनगिर येथून दुपारी ४:०० वाजता माळी समाज मंगल कार्यालयाजवळील राहत्या घरून निघणार
![]()
तरुणाईवर शोककळा… कै. चेतन साहेबराव माळी यांचे आकस्मिक निधन
त्यांची अंत्ययात्रा आज सोनगिर येथून दुपारी ४:०० वाजता माळी समाज मंगल कार्यालयाजवळील राहत्या घरून निघणार
सोनगिर प्रतिनिधी
सोनगीर येथील साहेबराव पितांबर माळी यांचे जेष्ठ चिरंजीव कै. चेतन साहेबराव माळी यांचे आज दिनांक २४ फेब्रुवारी, मंगळवार रोजी सकाळी ६:३० वाजता आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने माळी कुटुंबियांसह संपूर्ण सोनगीर परिसरावर शोककळा पसरली आहे.
कै. चेतन माळी हे मनमिळावू, प्रेमळ व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबियांसह मित्रपरिवार व समाजबांधवांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ४:०० वाजता माळी समाज मंगल कार्यालयाजवळील राहत्या घरून निघणार आहे.
ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व दुःखद प्रसंगात कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
शोकाकुल :
साहेबराव पितांबर माळी
राकेश साहेबराव माळी
व समस्त निकम परिवार, सोनगीर.
(मराठी लाईव्ह न्युज च्या वतीने विनम्र अभिवादन💐)

