राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांना पहिली राखी देत शुभांगी ताई पाटील यांची एक लाख राखी उपक्रमास सुरुवात.*
![]()
*राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांना पहिली राखी देत शुभांगी ताई पाटील यांची एक लाख राखी उपक्रमास सुरुवात.*
धुळे दिनांक :२७
शिवसेनेच्या राज्य उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्याद्वारे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील एक लाख शिक्षक, पदवीधरांना राखी पाठवण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात राज्याचे उपमुख्यमंत्री व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ना. एकनाथ शिंदे साहेब यांना पहिली राखी देऊन करण्यात आली. नुकत्याच शुभांगी ताई पाटील यांनी मुंबई येथे जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे साहेब यांना पहिली राखी देत सदर उपक्रमाची माहिती दिली. राज्यातील बहिणीं प्रती भावाचे कर्तव्य याची आठवण आणि भावांप्रती बहिणीची माया अबाधित राहावी या साठी सदरचा उपक्रम दरवर्षी शुभांगी ताई पाटील यांच्यातर्फे राबविण्यात येतो. सदर राखी बरोबर पाकिटा मध्ये भावांप्रती एक भावनिक पत्र दरवर्षी देण्यात येते. ज्या पत्रावर शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब तसेच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब व श्रीकांत शिंदे साहेब यांचा देखील फोटो असून जेणेकरून आपल्या लाडक्या भावांची म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्याची आठवण व जाणीव सर्वांना व्हावी हा या मागचा उद्देश आहे.
महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी राज्यातील विशेषतः नाशिक विभागातील सर्व शाळांवर तसेच शिक्षक व पदवीधरा पर्यंत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते प्रत्येक शाळेवर जाऊन शुभांगी ताई पाटील यांच्या राख्या व संदेश पोहोचवण्याचे काम मागील सुमारे आठ वर्षापासून करत आहेत. अशाप्रकारे शिक्षक पदवीधरां पर्यंत राख्या पोहोचविण्याचा उपक्रम हा शुभांगी ताई पाटील यांनी सर्वप्रथम सुरू केला असून त्यांच्या या उपक्रमाचे शिक्षक पदवीधरां पासून तर विविध नगराध्यक्ष व राजकीय पदाधिकाऱ्यांनी कडून सर्वत्र कौतुक होत आहे.

