नोबेल इंटरनॅशनल स्कूल पाळधी व पोद्दार लर्न स्कूल अमळनेरचे संस्थापक चेअरमन प्रशांत सूर्यवंशी यांना पितृशोक , कै. भगवान शंकर सूर्यवंशी यांचे अल्पशा आजाराने निधन; पाळधी खुर्द येथे आज अंत्यविधी
![]()
नोबेल इंटरनॅशनल स्कूल पाळधी व पोद्दार लर्न स्कूल अमळनेरचे संस्थापक चेअरमन प्रशांत सूर्यवंशी यांना पितृशोक
कै. भगवान शंकर सूर्यवंशी यांचे अल्पशा आजाराने निधन; पाळधी खुर्द येथे आज अंत्यविधी
अमळनेर/पाळधी खुर्द प्रतिनिधी
नोबेल इंटरनॅशनल स्कूल पाळधी खुर्द तसेच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, अमळनेरचे संस्थापक चेअरमन श्री. प्रशांत सूर्यवंशी यांचे वडील कै. भगवान शंकर सूर्यवंशी (वय ८५) यांचे मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.१५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
कै. भगवान शंकर सूर्यवंशी हे कुटुंबवत्सल, प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांनी आपल्या कुटुंबावर संस्कारांचे भक्कम अधिष्ठान निर्माण केले. त्यांच्या निधनामुळे सूर्यवंशी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच त्यांच्या परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
आज पाळधी खुर्द येथे अंत्यविधी
कै. भगवान शंकर सूर्यवंशी यांचा अंत्यविधी बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता पाळधी खुर्द येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा पाळधी येथील राहत्या घरापासून निघणार आहे.
सूर्यवंशी परिवारावर दुःखाचा डोंगर
कै. भगवान शंकर सूर्यवंशी यांच्या निधनाने सूर्यवंशी परिवारावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात श्री. प्रविण भगवान सूर्यवंशी, श्री. भानुविलास भगवान सूर्यवंशी, श्री. प्रशांत भगवान सूर्यवंशी आणि श्री. गोरख बाबूराव सूर्यवंशी तसेच समस्त सूर्यवंशी परिवार असा परिवार आहे.
नोबेल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी खुर्द आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर परिवाराच्या वतीनेही कै. भगवान शंकर सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, सूर्यवंशी परिवाराच्या दुःखात सर्वजण सहभागी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
“अमूल्य व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते, पण त्यांनी दिलेले प्रेम, संस्कार आणि आठवणी सदैव आपल्या हृदयात जिवंत राहतात.”
संपर्क : ९९२३७२८९०४


(प्रखर जनसंवाद व मराठी लाईव्ह न्यूज परिवाराच्या वतीने दादासाहेब कै. भगवान शंकर सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.)

