पोलीस-जनतेतील विश्वासाचा सेतू अधिक भक्कम करण्याचा संकल्प!,  धुळ्यात राज्यस्तरीय चर्चासत्रासह ८५ पोलीस, सैन्यदल व एनसीसी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ‘सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव’ पुरस्काराने सन्मान
1 min read

पोलीस-जनतेतील विश्वासाचा सेतू अधिक भक्कम करण्याचा संकल्प!, धुळ्यात राज्यस्तरीय चर्चासत्रासह ८५ पोलीस, सैन्यदल व एनसीसी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ‘सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव’ पुरस्काराने सन्मान

Loading

पोलीस-जनतेतील विश्वासाचा सेतू अधिक भक्कम करण्याचा संकल्प!

धुळ्यात राज्यस्तरीय चर्चासत्रासह ८५ पोलीस, सैन्यदल व एनसीसी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ‘सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव’ पुरस्काराने सन्मान

धुळे प्रतिनिधी
श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे साहित्य, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुळे आणि रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस आणि जनता या विषयावरील एक दिवशीय राज्यस्तरीय चर्चासत्र आणि सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव पुरस्कार वितरण संपन्न. चर्चासत्राचे उद्घाटन धुळे येथील 48 महाराष्ट्र बटालियनचे कर्नल श्री. सुदीप मिश्रा यांच्या शुभहस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष भय्यासो. डॉ. एस. टी. पाटील यांनी भूषविले. याप्रसंगी व्यासपीठावर सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, रिअल इंडो गुरुकुल फाउंडेशन चे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. संभाजी पाटील, उपाध्यक्ष डॉ. मोहन पावरा, प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील, प्राचार्य डॉ. पी. एस. लोहार, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे, प्राचार्य डॉ. जितेंद्र तलवारे, प्राचार्य डॉ.संजय हिरे, सुभेदार मोहम्मद इकबाल आदी उपस्थित होते. या चर्चासत्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणारे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी सैन्यदलातील अधिकारी जवान एनसीसीचे अधिकारी सहभागी झाले. यावेळी 85 अधिकारी, कर्मचारी यांना राज्यस्तरीय सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
उद्घाटन पर भाषणात कर्नल सुदीप मिश्रा म्हणाले की, पोलीस, सैन्यदल आणि नागरिक हे राष्ट्राच्या सुरक्षिततेचे महत्त्वाचे घटक असून त्यांच्यातील परस्पर विश्वास व सहकार्य अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा अहोरात्र कार्यरत असते, त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव आणि समाजाकडून मिळणारे सहकार्य हे त्यांचे मनोबल वाढवणारे आहे. युवकांनी शिस्त, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी अंगीकारून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे. रिअल इंडो ग्लोबल व्हिजन फाउंडेशनने पुरस्कार वितरणासोबत पोलीस- जनता संबंधांवर चर्चासत्र आयोजित करून समाजाच्या ज्वलंत विषयावर सकारात्मक संवादाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात भय्यासो. डॉ.एस.टी.पाटील यांनी सांगितले की, पोलीस आणि जनता यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाल्यास कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता अधिक प्रभावीपणे टिकवता येईल युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रीय सहभाग घ्यावा तसेच विकसित भारतासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार आचरणात आणावे.
रिअल इंडो ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मुख्य आयोजक प्रो. डॉ. संभाजी पाटील प्रास्ताविकात म्हणाले की, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची 125 वी जयंती वर्षानिमित्त राष्ट्र, समाज, युवक, महिला यांच्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व्हावा तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रएकता, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी कार्य गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुप्रसिद्ध सनदी लेखापाल मा. प्रा. प्रकाश गंगाधर पाठक यांना “जीवन गौरव पुरस्कार” देण्यात आला त्या सन्मानपत्राचे वाचन प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांनी केले. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक जगदीशसिंह परदेशी म्हणाले की, रिअल इंडो ग्लोबल फाउंडेशनने पुरस्कार वितरणासोबत ‘पोलीस आणि जनता यांच्यातील संबंध’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करून सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम राबविला. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने कार्य गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील तसेच अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी, एनसीसी अधिकारी, सैन्य दलातील जवान यांनी आनंद व्यक्त करून आपल्या भावना प्रकट केल्या.

या चर्चासत्रात प्रा डॉ. संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ कृष्णा वसावे यांनी “राष्ट्र उभारणीत सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान एक अभ्यास” या विषयावर पीएचडी केल्याबद्दल आणि प्रा डॉ.अनिल साळुंखे यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे विवेकशील नेतृत्व- एक अभ्यास या विषयावर संशोधन केल्याने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या उपक्रमाबद्दल श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे चेअरमन बाबासो श्री कुणालजी पाटील, उपाध्यक्ष डॉ एस टी पाटील,उपाध्यक्ष श्री प्रफुल्ल कुमार सिसोदे, कुलसचिव श्री नरेंद्रकुमार सुर्वे, कार्यालयीन अधीक्षक शशिकांत पाटील, नितीन कोतेकर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच या चर्चासत्रात प्राचार्य डॉ. प्रकाश लोहार लिखित 35 व्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक पाटील, प्रा.डॉ.अमोल नंदवाडकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य के.एम.बोरसे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन प्रा डॉ मोहन पावरा यांनी केले. कार्यक्रम यशस्वीसाठी एनसीसी व करिअर कट्टाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *