शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू, मितभाषी आणि प्रेरणादायी नेतृत्व – भैय्यासाहेब मगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
![]()
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू, मितभाषी आणि प्रेरणादायी नेतृत्व –
भैय्यासाहेब मगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अभ्यासपूर्ण विचारसरणी आणि शांत, संयमी स्वभावाने आपली वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे भैय्यासाहेब मगर सर. पी.टी.ए संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राला योग्य दिशा मिळावी यासाठी त्यांनी वेळोवेळी निवेदने सादर करून सातत्याने पाठपुरावा केला आहे. शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी, परीक्षा कॉपीमुक्त व पारदर्शक व्हाव्यात यासाठी ते नेहमीच कटिबद्ध आणि प्रयत्नशील राहिले आहेत.
‘साई इंग्लिश अकॅडमी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत विविध शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकास उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत, स्पर्धात्मक वृत्ती वाढावी आणि गुणवंतांचा सन्मान व्हावा यासाठी ‘साई रत्न’ पुरस्कारासारखे उपक्रम त्यांनी सुरू ठेवले आहेत.
पूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि संस्कारांची बीजे रोवण्याचे कार्य ते निष्ठेने करीत आहेत.
अत्यंत गोड, मितभाषी आणि नेहमीच मदतीसाठी धावून येणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांनाच आपलेसे वाटते.
म. वा. मंडळाचे कार्यवाहक तथा साई इंग्लिश अकॅडमीचे संचालक, आमचे स्नेही भैय्यासाहेब मगर यांना वाढदिवसानिमित्त संत गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना — त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच शैक्षणिक व सामाजिक सेवा अखंड घडत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!💐🎂💐🎂💐🎂💐
ईश्वर आर. महाजन
पत्रकार, अमळनेर
📞 9860352960

