कळमसरे येथील गुलाब भिका चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन
1 min read

कळमसरे येथील गुलाब भिका चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन

Loading

कळमसरे येथील गुलाब भिका चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन

अमळनेर प्रतिनिधी
कळमसरे (ता. अमळनेर) येथील प्रगतशील शेतकरी, विकास सोसायटीचे माजी चेअरमन ,व कळमसरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कै. गुलाब भिका चौधरी (वय 82) यांचे मंगळवार, दि. 16 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
कै. गुलाब भिका चौधरी हे कळमसरे गावातील माजी सरपंच कै. भिका महादू चौधरी उर्फ बापूजी यांचे सुपुत्र असून, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी ग्रामसेवेत सक्रिय सहभाग घेतला. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून त्यांनी जबाबदारीने काम करत गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. एक आदर्श शेतकरी म्हणून त्यांनी शेतीसोबतच सामाजिक कार्यातही सातत्याने सहभाग नोंदविला.
आप्पासाहेबांचा स्वभाव शांतप्रिय, संयमी व मनमिळावू होता. “कम बोलो, मीठा बोलो, लेकिन धीरे बोलो” हे तत्त्व त्यांनी आयुष्यभर अंगीकारले होते. या संस्कारांची शिदोरी त्यांनी आपल्या मुलांनाही दिली. साधेपणा, प्रामाणिकपणा व माणुसकी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष गुण होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, दोन मुले, एक मुलगी, जावई, नातवंडे व पुतणे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या अंत्ययात्रेस कळमसरे येथील सर्व समाजबांधव, ग्रामस्थ मंडळ, नातेवाईक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाने कळमसरे गावाने एक ज्येष्ठ, अनुभवसंपन्न व समाजशील व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

 

त्यांच्या अंत्ययात्रेला कळमसरे येथील सर्व समाज बांधव, कळमसरे ग्रामस्थ मंडळ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

(मराठी लाईव्ह न्युज परीवाराच्या वतीने आप्पासाहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *